हरभजन सिंग (Harbhajan Singh) हा खेळाडू आपल्या फिरकीसाठी नेहमीच चर्चेत असतो. मग ती फिरकी मैदानातील असो व मैदानाबाहेची जेव्हा तो मैदानावर असतो तेव्हा त्याच्या आक्रमक वृत्तीने तो लाइमलाइटमध्ये राहतो. मैदानाबाहेरही तो आपल्या वक्तृत्वामुळे चर्चेतच राहतो. हरभजन हा असा खेळाडू आहे जो आपले म्हणणे स्पष्टपणे मांडतो आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा तो सहमतीने उत्तरेही देतो. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील ICC T20 WorldCup-2021 सामन्यानंतर हरभजन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि यावेळी तो पाकिस्तानी लोकांना जसे उत्तरे देत त्यांना उत्तरे देत चर्चेत आला आहे. यावेळी पाकिस्तान मधील अनेक खेळाडू पत्रकार यांसारख्यावर हरभजनने तोफ डागली आहे. (Harbhajan Sing slams Pakistani reporter saying uneducated)
24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने पहिल्यांदाच विश्वचषकात भारताचा पराभव केला. यानंतर ट्विटरवर वॉर सुरू झाला पण भज्जीने इथे देखील आपले वर्चस्व गाजवले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरने ट्विटरवर हरभजनला त्याच्या जुन्या सामन्याची आठवण करून दिली ज्यात शाहिद आफ्रिदीने हरभजनला चार चेंडूत चार षटकार ठोकले होते. आणि त्यानंतर भज्जीने आमिरचा असा क्लास घेतला की प्रेक्षक बघतच राहिले. त्याने इंग्लंडमध्ये झालेल्या फिक्सिंगबद्दल अमीरला गुंडाळले आणि विचारले की लॉर्ड्सवर नो बॉल टाकण्यासाठी किती पैसे मिळाले होते ?
पाकिस्तानच्या या खेळाडूनंतर आता पाकिस्तानची महिला पत्रकार इकरा नसीर हरभजनच्या टीकेच्या रडारवर आली आहे . आमिरने चार चेंडूत चार षटकार मारल्याबद्दल बोलत असताना इकराने तो व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये आफ्रिदीने चार षटकार मारले होते.हा व्हिडिओ ट्विट करतंच तिने , "या हरभजन सिंगला तुमच्या आठवणीसाठी घ्या. चार चेंडूत चार षटकार." असे म्हणत डिवचले यानंतर हरभजन सिंगनेही इक्राला उत्तर देताना एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये त्याने आफ्रिदीच्या बॉलवर षटकार मारला होता आणि या व्हिडिओ एकाच लाईन मध्ये लिहिताना त्या पाकिस्तानी पत्रकाराला सडेतोड उत्तर दिले की हे पहा , "तुमच्या संदर्भासाठी निरक्षर पत्रकार."
हरभजन सिंग केवळ मैदानाबाहेरच नाही तर मैदानात देखील पाकिस्तानला अनेक वेळा पुरून उरला आहे. 2010 च्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघाला षटकाराने विजय मिळवून दिल्यानंतर अख्तरविरुद्धची त्याची प्रतिक्रिया आजही सर्वांना आठवते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.