Wriddhiman Saha: अरर! साहाने ट्राऊझरच घातली उलटी; हार्दिक, शमीलाही आवरेना हसू, Video एकदा पाहाच

Video: विकेटकिपिंग करण्यासाठी मैदानात उतरताना साहाने त्याची ट्राऊझर उलटी घातली होती.
Wriddhiman Saha
Wriddhiman SahaDainik Gomantak
Published on
Updated on

Wriddhiman Saha Funny moment: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी 51 वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरातने 56 धावांनी विजय मिळवला. गुजरातच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने मोलाचा वाटा उचलला. पण या सामन्यात त्याच्याबाबतीत एक गमतीशीर घटना घडली.

साहाने या सामन्यात 43 चेंडूत 81 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 4 षटकार मारले. तसेच त्याने शुभमन गिलबरोबर 142 धावांची सलामी भागीदारी केली. गिलनेही नाबाद 94 धावा केल्या. त्यामुळे गुजरातने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 227 धावा केल्या होत्या.

Wriddhiman Saha
IPL 2023: कॅच, नो-बॉल अन् मग सिक्स... हैदराबादने राजस्थानकडून हिरावला विजय, बटलरच्या 95 धावा व्यर्थ

त्यानंतर ज्यावेळी लखनऊ सुपर जायंट्स फलंदाजीसाठी उतरले, त्यावेळी गिलच्या ऐवजी गुजरातने अल्झारी जोसेफला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून घेण्यात आले होते. तसेच साहाऐवजी बदली यष्टीरक्षक म्हणून केएस भरतला खेळवण्याचा गुजरात विचार करत होते. मात्र, पंचांनी त्यासाठी परवानगी दिली नाही.

त्यामुळे साहाला घाईत सर्व तयारी करून मैदानात यावे लागले. तो लगेचच मैदानात आलाही. पण येताना तो चुकून त्याची ट्राऊझर उलटी घालून आला. पण त्याच्या हे मैदानात आल्यानंतर लक्षात आले. त्याने उलटी ट्राऊझर घातल्याचे पाहून हार्दिक पंड्या, मोहम्मद शमी, क्विंटन डीकॉक या खेळाडूंना हसू आवरले नाही. पण साहाने नंतर वेळ नसल्याने तसाच खेळ पुढे जाऊ दिला.

Wriddhiman Saha
Wriddhiman Saha: जेव्हा किंग कोहलीही होतो साहाचा फॅन, लखनऊविरुद्धच्या तुफानी फिफ्टीनंतर 'असं' केलं कौतुक

पण साहाला काही प्रमाणात यष्टीरक्षण करताना वेदना होत असल्याचे दिसले. त्यामुळे अखेर बदली यष्टीरक्षक म्हणून दोन षटकांनंतर भरत मैदानात आला आणि त्याने नंतर 18 षटके यष्टीरक्षण केले.

दरम्यान, सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास 228 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला 20 षटकात 7 बाद 171 धावाच करता आल्या. लखनऊकडून क्विंटन डी कॉकने ७० धावांची खेळी केली. तसेच काईल मेयर्सने 48 धावांची खेळी केली. पण बाकी कोणाला खास काही करता आले नाही. गुजरातकडून मोहित शर्माने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच मोहम्मद शमी, नूर अहमद आणि राशीद खान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com