गुजरात टायटन्ससाठी धक्का देणारी बातमी रविवारी (3 मार्च) आली आहे. झारखंडचा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन मिंझ याचा अपघात झाला असून त्याला तो दुखापतग्रस्त झाला आहे. तो आयपीएल 2024 साठी गुजरात टायटन्सचा भाग आहे.
21 वर्षीय रॉबिन मिंझला आयपीएल 2024 च्या लिलावात गुजरात टायटन्सने 3.6 कोटी रुपयांना खरेदीकेले आहे. दरम्यान, मीडियातील रिपोर्ट्सनुसार तो कावासाकी सुपरबाईक चालवत होता.
यावेळी समोरून दुसरी एक बाईक अचानक आल्याने त्याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे त्याला अपघात झाला. या अपघातात त्याच्या बाईकच्या पुढील भागाचे नुकसान झाले असून त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान,रिपोर्ट्सनु रॉबिनला झालेल्या दुखापती गंभीर नाहीत. सध्या त्याच्यावर स्थानिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या वडिलांनीही याबाबत माहिती दिली आहे.
त्याचे वडिल फ्रान्सिस मिंझ यांनी न्यूज 18 क्रिकेट नेक्झ्टला सांगितले की 'त्याची बाईक समोरून आलेल्या बाईकला धडकल्याने त्याचे नियंत्र सुटले. सध्या काहीही गंभीर नसून सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.'
दरम्यान मिंझची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि इंग्लंड यांच्यातील रांचीला झालेल्या चौथ्या कसोटीनंतर विमानतळावर गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार शुभमन गिलने रॉबिनच्या वडिलांची भेट घेतली होती.
यावेळी त्यांच्याशी गप्पाही गिलने मारल्या होत्या. रॉबिनचे वडील रांचीमधील बिरसा मुंडा विमानतळावर सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. गिल आणि त्यांच्या भेटीचा व्हिडिओही गुजरातने शेअर केला होता.
दरम्यान, गुजरात टायटन्सने रॉबिनला निवडण्यापूर्वी त्याने मुंबई इंडियन्सचेही ट्रायल्स दिले होते. त्याला आता जर गुजरातकडून आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर तो आयपीएल खेळणारा खेळणारा पहिला आदिवासी क्रिकेटपटू ठरणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.