Leon Luke Mendonca: ग्रँडमास्टर लिऑन स्लोव्हेनियातही यशस्वी; सलग दुसरे विजेतेपद

विजयी धडाका ः सर्व नऊही डाव जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब
स्लोव्हेनियातील 27 हिट ओपन बुद्धिबळ विजेत्या लिऑन मेंडोन्सा (उजवीकडे) याच्यासमवेत स्पर्धा आयोजक.
स्लोव्हेनियातील 27 हिट ओपन बुद्धिबळ विजेत्या लिऑन मेंडोन्सा (उजवीकडे) याच्यासमवेत स्पर्धा आयोजक.Dainik Gomantak
Published on
Updated on

Grandmaster Leon Luke Mendonca: गोव्याचा युवा ग्रँडमास्टर लिऑन ल्युक मेंडोन्सा याने युरोपियन दौऱ्यातील यशस्वी धडाका कायम राखताना स्लोव्हेनियातील स्पर्धेत विजेतेपद पटकावले. यावेळी त्याने सर्व नऊही डावांत विजयी कामगिरी साधण्याचा पराक्रम केला.

स्लोव्हेनियातील 27 हिट ओपन बुद्धिबळ विजेत्या लिऑन मेंडोन्सा (उजवीकडे) याच्यासमवेत स्पर्धा आयोजक.
Suryakumar Yadav: 'सूर्याची सॅमसनबरोबर तुलना नकोच, जर तो...', टीकाकारांना कपिल देव यांच चोख उत्तर

27 हिट ओपन बुद्धिबळ स्पर्धेत लिऑनने नऊ गुण प्राप्त करताना मातब्बर खेळाडूंना नमविले. नोव्हा गोरिसा चेस क्लबतर्फे घेण्यात आलेल्या या स्पर्धेत लिऑनने पाच ग्रँडमास्टर, एक इंटरनॅशनल मास्टर, दोन फिडे मास्टर व एका कँडिडेट मास्टर खेळाडूवर विजय नोंदवून घोडदौड राखली.

या स्पर्धेच्या अ गटात 13 देशांतील एकूण 84 खेळाडूंचा सहभाग होता, त्यात लिऑनसहा दहा जण ग्रँडमास्टर होते.

एलो गुणांत भरीव वाढ

लिऑनने या स्पर्धेतील प्रेक्षणीय खेळाद्वारे 3196 रेटिंगची कामगिरी साधताना 26.40एलो गुणांची कमाई केली. त्यामुळे तो आता 2600 एलो गुण मानांकनाजवळ पोहचला आहे. 17 वर्षीय गोमंतकीय बुद्धिबळपटूचे सध्या 2558 एलो गुण आहेत.

स्लोव्हेनियातील 27 हिट ओपन बुद्धिबळ विजेत्या लिऑन मेंडोन्सा (उजवीकडे) याच्यासमवेत स्पर्धा आयोजक.
IND vs AUS: चेन्नई वनडेत मैदानावरच विराटचा स्टॉयनिसला जोरदार धक्का, Video होतोय व्हायरल

सलग दुसरे विजेतेपद

युरोप दौऱ्यातील लिऑनचे स्लोव्हेनियातील हे सलग दुसरे विजेतेपद ठरले. जर्मनीत मार्चमध्येच झालेल्या 38 व्या चेसऑर्ग बुद्धिबळ महोत्सवात अपराजित राहत त्याने जेतेपद मिळविले होते.

विश्वनाथन आनंदने केले कौतुक

भारताचा पाचवेळचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने लिऑनच्या स्लोव्हेनियातील नऊ पैकी नऊ गुण कामगिरीची दखल घेत कौतुक केले आहे. ‘‘अभिनंदन, महत्त्वाकांक्षी आणि चिकाटी या गुणामुळे तो विस्मयकारक व्यक्ती बनला आहे.

त्याच्या बुद्धिबळासाठी हे गुण सर्वोत्तम आहेत. आमच्या सहकाऱ्याचा अभिमान वाटतो,’’ असे सोशल मीडियाद्वारे लिऑनचे अभिनंदन करताना आनंदने नमूद केले. गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीनेही लिऑनला शाबासकी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com