IND vs AUS: चेन्नई वनडेत मैदानावरच विराटचा स्टॉयनिसला जोरदार धक्का, Video होतोय व्हायरल

Viral Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नईला झालेल्या वनडेत विराट स्टॉयनिसला धक्का देताना दिसला होता.
Virat Kohli | Marcus Stoinis
Virat Kohli | Marcus StoinisDainik Gomantak
Published on
Updated on

Virat Kohli Marcus Stoinis friendly collision: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (22 मार्च) चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर तिसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात 21 धावांनी विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. दरम्यान, हा सामना सुरू असताना विराट कोहली मार्कस स्टॉयनिलला धक्का देताना दिसला. पण ही कृती मैत्रीच्या भावनेने झाल्याने त्यावर कोणताही वाद झाला नाही.

गेल्या काही वर्षात विराटचे ऑस्ट्रेलियन खेळाडूंबरोबरील संबंध सुधारल्याचे दिसून आले आहेत. तो नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यातील सामन्यांदरम्यान देखील स्टीव्ह स्मिथ, नॅथन लायन यांसारख्या खेळाडूंबरोबर मैत्रीपूर्ण संवाद साधताना दिसला होता. याच मैत्रीच्या भावनेने तो चेन्नई वनडेदरम्यान स्टॉयनिसला चालू सामन्यात धक्का देताना दिसला होता.

Virat Kohli | Marcus Stoinis
Virat - Anushka Viral Video : चालताना अवघडलेल्या अनुष्काचा गाऊन विराटने सांभाळला...नेटीजन्सकडून कौतुक

ही घटना भारतीय संघ ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 270 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना 21 व्या षटाकादरम्यान घडली. त्यावेळी विराट आणि केएल राहुल फलंदाजी करत होते. तसेच स्टॉयनिस गोलंदाजी करत होता.

त्याने टाकलेल्या एका चेंडूवर केएल राहुलला धाव काढता आली नाही. त्यानंतर पुन्हा आपल्या जागेवर विराट जात असताना स्टॉयनिसच्या जवळ गेला आणि त्याच्या खांद्याला जोरात धक्का दिला. त्यानंतर विराटने स्टॉयनिसकडे रोखूनही पाहिले. पण नंतर स्टॉयनिसला विराटचा हेतू जाणवल्यानंतर तोही हसत पुढे गेला. या घटनेचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान, विराट आणि स्टॉयनिस २०१९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळले असून त्यावेळी त्यांच्यात चांगली मैत्री झाल्याचेही दिसले होते.

Virat Kohli | Marcus Stoinis
Virat Kohli: 'नाटू नाटू' नंतर आता 'लुंगी डान्स'वर थिरकला किंग कोहली, Video व्हायरल

ऑस्ट्रेलियाने जिंकला सामना

दरम्यान ऑस्ट्रेलियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराटने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर भारताकडून हार्दिक पंड्याने 40 धावा केल्या. याचबरोबर रोहित शर्मा (30), शुभमन गिल (37) आणि केएल राहुल (32) यांनीही छोटेखानी खेळी केल्या पण तेही खेळपट्टीवर स्थिरावल्यावर बाद झाले.

त्यामुळे भारताला या सामन्यात 49.1 षटकात सर्वबाद 248 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाकडून ऍडम झम्पाने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात सर्वबाद 269 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्शने सर्वाधिक 47 धावांची खेळी केली. तसेच ऍलेक्स कॅरेने 38 धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com