IND vs ENG World Cup 2023
IND vs ENG World Cup 2023Dainilk Gomantak

World Cup 2023: इंग्लंडवरील भारताच्या विजयानंतर चाहत्यांनी गायले 'वंदे मातरम'; नेत्रदीपक लाइट शो ने वेधले लक्ष

IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला.
Published on

IND vs ENG: एकदिवसीय विश्वचषक 2023 मधील 29 वा सामना भारतविरुद्ध इंग्लंड यांच्यात लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्माच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या होत्या.

कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 87 धावा केल्या. तर दुसरीकडे, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी त्यांच्या सुरुवातीच्या स्पेल दरम्यान केलेल्या विलक्षण कामगिरीमुळे भारताने रविवारी इंग्लंडवर 100 धावांनी विजय मिळवला.

2023 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे, तर गतविजेत्या इंग्लंडचा हा पाचवा पराभव आहे.

दरम्यान, या सामन्याचा खरा नायक ठरला तो शमी, ज्याने 22 धावांत 4 बळी घेतले. तर बुमराहने 32 धावांत 3 बळी घेतले. इंग्लिश फलंदाजांना पुन्हा एकदा लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.

टीम इंडियाच्या दिग्गज गोलंदाजांनी इंग्लंडला 34.5 षटकांत 129 धावातच रोखले, परिणामी सहा सामन्यांत त्यांचा पाचवा पराभव झाला. या पराभवामुळे इंग्लंडची (England) उपांत्य फेरी गाठण्याची आशाही संपुष्टात आली, तर स्पर्धेतील एकमेव अपराजित संघ असलेला भारत पुढील फेरीत आपले स्थान निश्चित करण्याच्या जवळ पोहोचला.

IND vs ENG World Cup 2023
IND vs ENG: इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाने का घातला ब्लॅक आर्मबँड? BCCI ने स्पष्ट केले कारण

दुसरीकडे, या शानदार विजयानंतर स्टेडियममधील नेत्रदीपक लाइट शोने चाहत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, भारताचा (India) विजय साजरा करताना चाहत्यांनी 'वंदे मातरम्' गायले.

दरम्यान, 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्या पॉवरप्लेमध्येच संघाने 4 गडी गमावले. इंग्लंडने 10 षटकांत 4 गडी गमावून 40 धावा केल्या.

जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात डेव्हिड मलान (16) आणि जो रुट (0) यांना सलग चेंडूवर बाद केले. यानंतर मोहम्मद शमीने बेन स्टोक्स (0) आणि जॉनी बेअरस्टो (14) यांनाही लागोपाठच्या चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

कुलदीप यादवने आपल्या मॅजिक बॉलने कर्णधार जोस बटलरला (10) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. शमीने दुसऱ्या स्पेलमध्ये मोईन अलीला (15) बाद केले.

जडेजाने ख्रिस वोक्सला (10) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर कुलदीपने लियाम लिव्हिंगस्टोनला (27) बाद करुन भारताचा विजय जवळपास निश्चित केला. शमीने आदिल रशीदला बाद करुन चौथी विकेट घेतली. शेवटी जसप्रीत बुमराहने मार्क वुडला बाद करुन इंग्लंडचा डाव संपवला.

IND vs ENG World Cup 2023
IND vs ENG: भारताने लगावला विजयाचा 'षटकार', गतविजेत्या इंग्लंडचा 100 धावांनी पराभव

तत्पूर्वी, रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत नऊ गडी गमावून 229 धावा केल्या होत्या.

विश्वचषक 2023 मध्ये भारताने प्रथमच पहिल्या डावात फलंदाजी केली. इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपच खराब झाली. शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेट्स संघाने 12 षटकांतच गमावल्या होत्या.

तसेच, पहिल्या पॉवरप्लेमध्ये दोन गडी गमावून भारताने केवळ 35 धावा केल्या होत्या. यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुलमध्ये तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी झाली. केएल राहुल 58 चेंडूत 39 धावा करुन बाद झाला.

रोहित शर्माने चांगली खेळी केली पण स्पर्धेतील आपले दुसरे शतक त्याला झळकावता आले नाही. रोहितने 101 चेंडूत 87 धावा केल्या. रोहित बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजा जास्त वेळ क्रीजवर टीकू शकला नाही आणि केवळ 8 धावा करुन बाद झाला.

मोहम्मद शमीने 5 चेंडूत एक धाव काढली. सूर्यकुमार यादव 47 चेंडूत 49 धावा करुन बाद झाला. शेवटी कुलदीप आणि बुमराह यांच्यात 21 धावांची भागीदारी झाली.

दुसरीकडे, हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत भारताने पाच गोलंदाज मैदानात उतरवले होते. या सामन्यात आर अश्विनला संधी देण्यात आली नाही. 46,000 चाहत्यांच्या उपस्थितीत भारताने हा सामना शानदाररित्या जिंकला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com