गोल्डन बॉय नीरज चोप्रा करणार प्रधानमंत्री मिशनची सुरवात

टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा 4 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील संस्कारधाम शाळेला भेट देतील
Neeraj Chopra
Neeraj ChopraDainik Gomantak
Published on
Updated on

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Niraj Chopra) 4 डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील संस्कारधाम शाळेला भेट देतील आणि संतुलित आहार, फिटनेस आणि खेळांबद्दल जागरूकता निर्माण करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm modi) यांच्या मिशनची सुरुवात करतील. मोदींनी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानी टोकियो ऑलिम्पियन्सच्या भेटीदरम्यान, कुपोषणाविरुद्ध जनजागृती करण्यासाठी आणि शाळकरी मुलांना खेळासाठी प्रेरित करण्यासाठी 2023 मध्ये स्वातंत्र्य दिनापूर्वी प्रत्येकी 75 शाळांना भेट देण्याचे आवाहन भारतीय ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन्सना केले होते.

Neeraj Chopra
विराट कोहलीवरून BCCI मध्ये वादंग, ODI चं कर्णधारपदही धोक्यात ?

"भालाफेकपटू निरज चोप्रा पंतप्रधानांच्या मिशनला सुरुवात करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या ऑलिम्पियन आणि पॅरालिम्पियन्सना शाळांना भेट देण्याचे आणि संतुलित आहार, फिटनेस, खेळ आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी बोलण्याचे आवाहन केले आहे. 4 डिसेंबर रोजी नीरज चोप्रा अहमदाबाद येथील संस्कारधाम शाळेत या मिशनची सुरुवात करणार आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि शिक्षण मंत्रालय पुढील दोन वर्षांत 'मीट द चॅम्पियन्स' कार्यक्रम म्हणून चालवण्यावर काम करत आहेत. हा कार्यक्रम 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग असेल जो देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे." असे आपल्या ट्विटमध्ये क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

Neeraj Chopra
Ind vs NZ: विराट कोहलीचा प्लेइंग इलेव्हन संघ अद्यापही गुलदस्त्यातच

नीरज चोप्राने टोकियो गेम्समध्ये 87.58 मीटर भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या इतर भारतीय खेळाडूंनी देशासाठी विक्रमी पदके जिंकली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com