सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला आला ताप

Neeraj Chopra: त्याचा कोविड रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला असला तरी, डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
Gold medalist Neeraj Chopra got 
High fever
Gold medalist Neeraj Chopra got High feverDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: टोकियो ऑलिम्पीक (Tokyo Olympics) सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) गेल्या दोन दिवसांपासून तापाने फणफणला आहे. त्यामुळे हरियाणा सरकारने शुक्रवारी आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला देखील नीरज उपस्थित राहू शकला नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांची कोविड-19 देखील चाचणी करण्यात आली आहे. ताप आली असली तरी नीरजचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. माध्यमांशी बोलताना नीरज चोप्राच्या जवळच्या व्यक्तींनी असे सांगितले नीरजची प्रकृती आता स्थिर होते आहे.

"कालपर्यंत नीरजला 103 डीग्री ताप होता. मात्र आता तो बरा होतो आहे. त्याचा कोविड रिपोर्ट देखील निगेटिव्ह आला असला तरी, डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मागच्या काही दिवसांत तो खुप जास्त व्यस्त होता, त्यामुळे तो आजारी पडला," असे नीरजच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे.

Gold medalist Neeraj Chopra got 
High fever
ENG vs IND: राहुलची अशी फलंदाजी यापूर्वी कधीही पाहिली नाही - रोहित शर्मा

दरम्यान "नीरज आज संध्याकाळी राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतो. इतर सर्व खेळाडू सध्या अशोका हॉटेलमध्ये आहेत, मात्र नीरज थेट कार्यक्रमात दाखल होईल." असेही त्यांनी सांगितले आहे. दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये ऑलिम्पीकमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ishan Kishan Breaks 8 Year T20 Record
Small Savings Scheme Interest Rates Q3 2026
India Beats Pakistan 4-3 In Hockey
Ruhani Sharma Virat Kohli sister in law
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com