Khelo India Youth Games: अभिमानास्पद! गोव्याला वेटलिफ्टिंगमध्ये ब्राँझपदक

खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत राज्याला मिळालेले एकमेव पदक
Khelo India Youth Games
Khelo India Youth GamesDainik Gomantak

Khelo India Youth Games: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये रिक्त हस्ते परतण्याची गोव्यावरील नामुष्की गुरुवारी वेटलिफ्टर अमन याच्यामुळे टळली. त्याने मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत राज्यासाठी पहिले पदक पटकाविले.

(Goa's Aman Won Bronze Medal In Khelo India Youth Games 2023)

वेटलिफ्टिंग स्पर्धा इंदूर येथे सुरू आहे. युवा पुरुषांतील 89 किलो वजनगटात अमनला तिसरा क्रमांक मिळाला, त्याचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. त्याने एकूण 261 किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये 119, तर क्लीन अँड जर्कमध्ये 142 किलो वजन पेलण्याची किमया अमनने साधली. उत्तर प्रदेशच्या रिषभ यादव याने रौप्यपदक जिंकताना एकूण 262 किलो (111+151) वजन उचलले. सुवर्णपदक महाराष्ट्राच्या सानिध्य मोरे याने जिंकले. त्याने 125+146 मिळून एकूण 271 किलो वजन पेलले.

Khelo India Youth Games
Smart City Panjim: स्मार्ट सिटीच्या पहिल्या 'स्मार्ट रस्त्या'चे उद्धाटन, TCP मंत्री म्हणतात असाच...

महाराष्ट्र पहिल्या स्थानावर

महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडियाच्या पाचव्या पर्वातही दमदार कामगिरी केली आहे. सलग पाचव्या स्पर्धेत पदकांचे शतक ओलांडत महाराष्ट्राने या स्पर्धेतील आपले वर्चस्व सिद्ध केले. महाराष्ट्राने आता 38 सुवर्ण, 34 रौप्य आणि 31 कांस्यपदके मिळवत 103 पदकांसह आघाडी कायम राखली आहे. हरियाना, मध्य प्रदेश यांच्यात दुसऱ्या क्रमांकासाठी रस्सीखेच कायम आहे. हरियाना 63 पदकांसह दुसऱ्या, तर मध्य प्रदेश 61 पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com