Smart City Panjim: स्मार्ट सिटीच्या पहिल्या 'स्मार्ट रस्त्या'चे उद्धाटन, TCP मंत्री म्हणतात असाच...

मागील चार ते पाच महिन्यांपासून या रस्त्याचे कामु सुरू होते.
Smart City Panjim
Smart City PanjimDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्याची राजधानी पणजी शहराची देशात होणाऱ्या स्मार्ट शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तेव्हापासून पणजीत स्मार्ट शहारासंबधित विविध विकास कामे सुरू आहेत. स्मार्ट शहर संकल्पनेतील महत्वाचा घटक असलेल्या रस्त्याची कामे सध्या शहरात जोमात सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी खोदलेले रस्ते देखील दिसत आहेत.

दरम्यान, स्मार्ट पणजीतील पहिल्या स्मार्ट रस्त्याचे उद्धाटन आज (गुरूवारी) करण्यात आले. मागील चार ते पाच महिन्यांपासून या रस्त्याचे कामु सुरू होते.

Smart City Panjim
Mandovi Bridge: महत्वाची बातमी! जुना मांडवी पूल येत्या शनिवार, रविवार रात्रीचा बंद राहणार
Smart City Panjim
Smart City PanjimDainik Gomantak

काकुलो मॉल ते बालभवन असलेल्या रस्त्याचे उद्घाटन आज राज्याचे नगरनियोजन, वनमंत्री आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पणजी पालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात, जिल्हाधिकारी मामु हागे आणि इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

सध्या शहारत स्मार्ट सिटी संबधित विविध कामे सुरू आहेत. आज या रस्त्याचे उद्धाटन होत आहे. अशाच प्रकारचे काम सर्वत्र सुरू आहे. याच ठिकाणी आंतरराष्ट्रिय दर्जाचे फुटबॉल मैदान होत आहे. त्याचे देखील काम प्रगतीपथावर आहे. काम पूर्ण होईपर्यंत थोडा त्रास होत असतो. पण, एकदा काम पूर्ण झाल्यानंतर लोकच म्हणतील चांगले काम झाले आहे. असे मंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

Smart City Panjim
Naguesh Karmali: गोवा मुक्तीलढ्यातील धगधगता निखारा हरपला, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक नागेश करमली यांचे निधन
Smart City Panjim
Smart City PanjimDainik Gomantak

पणजी महापौर, जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्मार्ट सिटीचे योग्य पद्धतीने काम सुरू आहे. आंतरराष्ट्रिय दर्जाच्या सुविधा, रस्ते ही गरज आहे. या ठिकाणी होणाऱ्या मैदानामुळे मुलांना खेळण्यासाठी एक चांगल्या दर्जाचे मैदान उपलब्ध होणार आहे.

स्मार्ट सिटीचे काम करत असताना ड्रेनेज पाईप, पाण्याची पाईप, वीज यासारख्या गोष्टी एकत्र केल्या जातात त्यामुळे या कामांना वेळ लागतो. एक कि.मीचा रस्ता बांधण्यासाठी कोट्यवधी रूपयांचा खर्च येतो. एकदा काम पूर्ण झाल्यानंतर लोकच कामाचे कौतुक करतील. असे राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com