जिंकलेल्या सुवर्णपदकांसह संजना प्रभुगावकर.
जिंकलेल्या सुवर्णपदकांसह संजना प्रभुगावकर. Dainik Gomantak

Sanjana Prabhugaonkar: गोव्याच्या संजनाची दुबईतील जलतरण स्पर्धेत पदकांची लयलूट

पटकावली तीन सुवर्णपदके
Published on

Sanjana Prabhugaonkar: गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करताना जलतरणात प्रत्येकी दोन रौप्य व ब्राँझ मिळून एकूण चार पदके जिंकलेली संजना प्रभुगावकर दुबई येथील स्पर्धेत चमकली.

संयुक्त अरब अमिरातीतील दुबईस्थित अॅक्वा नेशन स्विम अकादमीचे प्रतिनिधित्व करताना संजनाने हमदान क्रीडा संकुलातील स्पीडो जलतरण स्पर्धेत तीन सुवर्णपदके जिंकली. तिने ५० मीटर बॅकस्ट्रोक, १०० मीटर बॅकस्ट्रोक व २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

जिंकलेल्या सुवर्णपदकांसह संजना प्रभुगावकर.
National Basketball: गोव्याच्या पुरुष बास्केटबॉल संघाची घोडदौड; मेघालयसह बलाढ्य हरियानाला धक्का

गेल्याच महिन्यात गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत संजनाने एकूण चार पदके मिळवली होती. त्यात दोन रौप्य आणि दोन ब्राँझ पदकांचा समावेश आहे.

कांपाल येथील जलतरण तलावात झालेल्या स्पर्धेत तिने महिलांच्या १०० मीटर बॅकस्ट्रोक शर्यतीत रौप्यपदक पटकावले होते. तसेच २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये तिने रौप्यपदक पटकावले होते तर २०० मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात तिने ब्राँझपदकाची कमाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com