ISL Football स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे हेच ध्येय! एफसी गोवाचे प्रशिक्षक मार्केझ आशावादी

ड्युरँड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने उंचावला आत्मविश्वास
Indian Super League Football: FC Goa
Indian Super League Football: FC GoaDainik Gomantak

Goa news in Marathiइंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धा सुरू होण्यास आठवडाभराचा कालावधी आहे. या स्पर्धेनिमित्त तयारीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या एफसी गोवा संघाने 132 व्या ड्युरँड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून मोसमाची सुरवात आश्वासक केली.

या कामगिरीने संघाचा आत्मविश्वास उंचावला असून आयएसएल स्पर्धेत आपला संघ चांगली कामगिरी करेल असा आशावाद मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केला.

मार्केझ यांनी संघातील खेळाडू नोआ सदोई, उदांता सिंग, मुहम्मद नेमिल यांच्यासह आयएसएल मीडिया डे कार्यक्रमात भाग घेतला आणि एफसी गोवाच्या तयारीविषयी माहिती दिली. ‘‘विजेतेपद पटकावणे हेच आमचे ध्येय आहे, पण सध्या मोसमातील पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करणे हेच लक्ष्य बाळगले आहे,’’ असे मार्केझ म्हणाले.

त्यांनी मोसमपूर्व सराव कार्यक्रम आणि खेळाडूंची तंदुरुस्ती यावर जास्त भर दिला. स्पॅनिश प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘‘जेथे फुटबॉलला धर्मासारखे मानले जाते अशा देशातील मी आहे. एफसी गोवासारख्या संघाशी करार करणे आणि आव्हान स्वीकारण्याची कल्पना खरोखरच छान आहे.’’

Indian Super League Football: FC Goa
ODI World Cup पूर्वी टीम इंडियाला नंबर 1 बनण्याची सुवर्णसंधी, करावं लागले 'हे' काम!

संघाच्या तयारीविषयी ते म्हणाले, ‘‘आगामी मोसम आमच्यासाठी खरोखरच चांगला असेल याबाबत मला विश्वास असून मी खूष आहे. दबाव झेलण्याच्या कारणास्तव प्रशिक्षक जबाबदारी स्वीकारतात असे मला वाटते आणि हे आमच्या कामाचा भाग आहे.

या परिस्थितीचा मी आनंद घेत आहे.’’ मार्केझ गतमोसमापर्यंत हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक होते.

नव्या खेळाडूंकडून अपेक्षा

आयएसएल स्पर्धेच्या इतिहासात 2014पासून एफसी गोवा संघाकडे सफल संघ या नात्याने पाहिले जाते, मात्र मागील दोन मोसम त्यांच्यासाठी अपयशी ठरले. स्पर्धेच्या नऊ वर्षांच्या कालावधीत एफसी गोवाने सहा वेळा प्ले-ऑफ फेरी गाठली.

परंतु गतमोसमात सातवा क्रमांक मिळाल्याने त्यांना प्ले-ऑफ फेरी हुकली होती, तर 2021-22 मध्ये नववा क्रमांक मिळाला होता. यंदा एफसी गोवा संघाने नवे खेळाडू करारबद्ध केले आहेत.

Indian Super League Football: FC Goa
Asia Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी बांगलादेशला मोठा झटका, अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज आशिया कपमधून बाहेर!

यामध्ये उदांता सिंग, संदेश झिंगन, रेनियर फर्नांडिस, रॉलिन बोर्जिस, बोरिस सिंग, नारायण दास, कार्ल मॅकह्यू, व्हिक्टर रॉड्रिगेझ, ओडेई ओनाइंडिया, कार्लोस मार्टिनेझ, पावलो रेट्रे, जय गुप्ता यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

पहिला सामना हैदराबादविरुद्ध

यावेळच्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवा संघ पहिला सामना 22 सप्टेंबरला हैदराबाद एफसीविरुद्ध हैदराबाद येथे खेळेल. त्यांचा घरच्या मैदानावर पहिला सामना फातोर्डा येथे 2 ऑक्टोबर रोजी स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पंजाब एफसीविरुद्ध होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com