Goa Cricket: 'गोव्या'चे सारथ्य आता 'सुयश' करणार

गोव्याच्या सीनियर संघाची प्रथमच पूर्णवेळ जबाबदारी
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचा अष्टपैलू क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याने यापूर्वी संघाचे वयोगट स्पर्धेत नेतृत्व केले आहे, मात्र सीनियर संघाचा पूर्णवेळ कर्णधार या नात्याने तो शनिवारपासून (ता. 12) सारथ्य करणार आहे.

(Goan cricketer Suyash Prabhudesai has been selected as the captain)

गोव्याचा संघ अळूर-बंगळूर येथे विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळेल, या स्पर्धेसाठी सुयशची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याने स्नेहल कवठणकर याची जागा घेतली आहे. गतमहिन्यात जयपूर येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेतील अखेरच्या सामन्यात स्नेहलने विश्रांती घेतल्यानंतर सुयश गोव्यातर्फे नाणेफेकीसाठी गेला होता. आता संपूर्ण एकदिवसीय स्पर्धेत 24 वर्षीय आयपीएल क्रिकेटपटू गोव्याचा कर्णधार असेल.

वर्षभरातील चौथा कर्णधार

सुयश हा गोव्याचा वर्षभरातील चौथा कर्णधार आहे. गतमोसमातील टी-20 स्पर्धेसाठी मुंबईकर पाहुणा एकनाथ केरकर याच्याकडे गोव्याचे नेतृत्व सोपविण्यात आले, मात्र फलंदाजीत सपशेल अपयशी ठरल्यानंतर या यष्टिरक्षकाने कर्णधारपदाची जबाबदारी नाकारली, नंतर एकदिवसीय व रणजी करंडक स्पर्धेसाठी फलंदाजीतील अनुभवी स्नेहल कवठणकर याला कर्णधारपदी नियुक्त करण्यात आले.

Goa Cricket
T20 WC: 'बिलियन डॉलर लीग क्रिकेटपेक्षा पाकिस्तानी संघ उत्कृष्ट' रमीज राजाने चोळले भारताच्या जखमेवर मीठ

या मोसमाच्या सुरवातीस सप्टेंबरमध्ये मोहाली येथे झालेल्या जे. पी. अत्रेय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत अमोघ देसाई गोव्याचा कर्णधार होता, मात्र त्याला पुढे संधी मिळाली नाही, शिवाय अमोघला गोव्याच्या टी-20 व एकदिवसीय संघातून वगळण्यात आले.

Goa Cricket
Sania Mirza Shoaib Malik Divorce: घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान सानियाने शेअर केला फोटो

वयोगट पातळीवर सुयश प्रभावी

वयोगट स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व करताना सुयशने छाप पाडली आहे. गतमोसमात त्याच्या नेतृत्वाखाली गोव्याने 25 वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारली होती. शिवाय वैयक्तिक पातळीवर फलंदाजीत सुयशने सातत्य राखले होते. अर्थात, सीनियर संघाचा कर्णधार या नात्याने सुयशवर मोठी जबाबदारी असेल आणि खडतर आव्हानास सामोरे जावे लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com