Goa Rain : राज्यात पावसाचा जोर ओसरला; माघार लांबणीवर

येत्या आठवड्यात हलक्या सरी बरसणार
IMD Goa
IMD Goa Dainik Gomantak

येत्या आठवड्यात राज्यातील बहुतांश ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. चार महिन्यांचा मान्सून हंगाम संपण्यास जेमतेम एक आठवडा शिल्लक असताना मान्सुन माघारीचा अंदाज लावता येणार नाही, असे ही भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) सूत्रांनी सांगितले.

(Still early to forecast monsoon withdrawal from Goa says India meteorological department)

IMD Goa
Sonali Phogat case : सावंत सरकारने पुरावे नष्ट केले, सरदेसाईंचे आरोप

मिळालेल्या माहितीनुसार नैऋत्य मान्सूनने वायव्य भागातून सहा दिवस उशीरा माघार घेण्यास सुरुवात केली आहे. तर गोव्यासाठी, माघारीची सामान्य तारीख 14 ऑक्टोबर आहे. राज्यात अद्याप पश्चिम वारे वाहत असल्याने आणि पुढील आठवड्यात पावसाच्या हालचालींमध्ये तुलनेने वाढ होण्याची शक्यता आहे.

काल शुक्रवारी सकाळपर्यंत पणजीमध्ये सर्वाधिक 7.9 मिमी, पेडणे 5.8 मिमी, काणकोण 4.2 मिमी आणि राज्यभरातील इतर पर्जन्यमापक केंद्रांवर कमी प्रमाणात पावसाची नोंद झाली. असल्याची माहिती मिळाली आहे.

IMD Goa
Goa Tourism Department: माेरजी किनाऱ्यावर कुटिर व्यावसायिकांचे साहित्य जप्त!

राज्यात मान्सूनने वायव्य भागातून माघार परतत असून याची अंदाजानुसार माघारीची तारीख 17 सप्टेंबर आहे,” असे एम आर रमेश कुमार म्हणाले. मच्छिमारांना उपरोक्त कालावधीत या भागात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. कारण यावेळी समुद्र काहीसा प्रतिकूल स्थितीत असण्याची शक्यता आहे. त्यामूळे मच्छीमारांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com