Sports: पदोन्नतीसाठी गोव्याची धडपड

Sports: 19 वर्षांखालील क्रिकेटमधील (U-19 Cricket) दोन्ही स्पर्धेत प्लेट विभागात
Sports: GCA academy ground Porvorim
Sports: GCA academy ground PorvorimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी ः कोरोना विषाणू महामारीच्या (Covid-19) सावटाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) आगामी मोसमात 19 वर्षांखालील (U-19) गटातील स्पर्धाही घेण्याचे नियोजन करत आहे. त्यादृष्टीने गोवा क्रिकेट असोसिएशननेही (Goa Cricket Association) तयारीवर भर देताना सोमवारपासून या वयोगटातील क्रिकेटपटूंचे शिबिर निश्चित केले आहे. मोसमातील विनू मांकड करंडक (Vinoo Mankad Trophy) एकदिवसीय आणि कुचबिहार करंडक (Cooch Behar Trophy) चारदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत खेळताना गोव्याच्या (Goa) संघाची पदोन्नतीसाठी धडपड असेल. मागील खेपेस प्लेट गटातून (Plate Group) बाहेर येण्यासाठी प्रयत्न केले होते, पण ते असफल ठरले.

Sports: GCA academy ground Porvorim
अनुराचे ‘टॉप 50’ लक्ष्य; राज्यातील बॅडमिंटनपटूंचा उत्साह दुणावला !

गोव्याची 2018-19 मोसमात कामगिरी खराब झाली. त्यामुळे कुचबिहार करंडक, तसेच विनू मांकड करंडक स्पर्धेत गोव्याची प्लेट गटात पदावनती झाली. 2019-20 मोसमात दोन्ही स्पर्धेत गोव्याला प्लेट गटातून पदोन्नती साधणे शक्य झाले नाही. कोरोना विषाणू महामारीमुळे बीसीसीआयने 2020-21 मोसमात ज्युनियर गट स्पर्धा घेण्याचा धोका पत्करला नाही. बीसीसीआयने अजून नव्या मोसमातील स्पर्धांची गटवारी, तसेच सविस्तर वेळापत्रक जाहीर केलेले नाही. तरीही 2019-20 मधील क्रमवारीनुसार 2021-22 मोसमात गोवा प्लेट गटातच खेळणार हे स्पष्ट आहे.

Sports: GCA academy ground Porvorim
जेव्हा किंग खानने दिनेश कार्तिकला दिलं होतं 'Private Jet'

नव्याने सुरुवात

गोव्याने 2019-20 मोसमात कर्नाटकचेमाजी रणजीपटू राजेश कामत (Rajesh Kamat) यांच्या मार्गदर्शनाखाली प्लेट गटात किल्ला लढविला, परंतु दोन्ही स्पर्धांत अव्वल क्रमांक थोडक्यात हुकला. यंदा पुन्हा दर्जेदार प्रशिक्षणासाठी ओळखले जाणाऱ्या कामत यांची ज्युनियर संघ प्रशिक्षकपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राजेश कामत यांना संघ बांधणी करताना नव्या खेळाडूंवर भर द्यावा लागेल, कारण दोन वर्षांपूर्वी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेल्या बहुतेक खेळाडूंनी 19 वर्षांखालील वयोगट ओलांडला आहे. साहजिकच कामत यांना नव्याने सुरुवात करावी लागेल. नव्या मोसमातील एकदिवसीय स्पर्धेत गोव्यासमोर उत्तराखंड, पुदुचेरी, ओडिशा या संघांचे, तर कुचबिहार करंडक स्पर्धेत बिहार, पुदुचेरी, ओडिशाचे आव्हान असेल. याशिवाय नवोदित असलेले ईशान्येकडील संघही गटात आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना जिंकण्याचे लक्ष्य बाळगावे लागेल.

Sports: GCA academy ground Porvorim
Sports: गोवा महिला क्रिकेट संघाची मोहीम सप्टेंबरपासून सुरु

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com