Air Indiaच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, पगारात झाली वाढ

टाटा समूहाचा भाग होताच कोरोना पूर्वीच्या स्तरावर पगार देण्यात येणार आहे.
Air India Employee Salary increment
Air India Employee Salary increment Dainik Gomantak
Published on
Updated on

Air India Employee Salary increment : टाटा समूहानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. देशातील कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये घट झाल्यामुळे विमान वाहतूक क्षेत्र सावरण्यास सुरुवात झाली आहे, तर एअर इंडिया (Air India Company) आपल्या कर्मचार्‍यांचे पगार टप्प्याटप्प्याने महामारीपूर्वीच्या स्तरावर पुनर्संचयित करत आहे. मंगळवारी विमान कंपनीच्या एका कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. (Great relief for Air India employees, increment in salaries)

Air India Employee Salary increment
रात्री प्रवास करण्यासाठी रेल्वेचा हा नियम घ्या जाणून; नाहीतर होईल नुकसान

गेल्या दोन वर्षांत, महामारीमुळे (Corona Pandemic) लादलेल्या निर्बंधांमुळे, भारतीय विमान वाहतूक क्षेत्रावर वाईट परिणाम झाला आणि देशातील सर्व विमान कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली. एअर इंडियाने मंगळवारी जारी केलेल्या माहितीनुसार, महामारी सुरू झाल्यानंतर विमानाचा उड्डाण भत्ता, विशेष वेतन आणि वैमानिकांचा वाइड बॉडी भत्ता 35 टक्के, 40 टक्के आणि 40 टक्के कपात करण्यात आला होता.

पण आता यावर्षी 1 एप्रिलपासून हे तीन भत्ते 20 टक्के, 25 टक्के वाढवून बहाल केले जात आहेत. महामारीच्या काळात केबिन क्रू मेंबर्सचा फ्लाइंग अलाऊन्स आणि वाइड बॉडी अलाऊन्स अनुक्रमे 15 आणि 20 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता. हे दोन्ही भत्ते 1 एप्रिलपासून 10 टक्के आणि 5 टक्के वाढवून बहाल करण्यात येत आहेत.

साथीच्या काळात अधिकारी आणि इतर कर्मचारी सदस्यांना दिले जाणारे भत्ते 50 टक्के आणि 30 टक्के कमी केले गेले होते. आता 1 एप्रिलपासून अधिकाऱ्यांचे भत्ते 25 टक्क्यांवर वाढवले जात आहेत, तर इतर कर्मचाऱ्यांचे भत्ते महामारीपूर्वीच्या पातळीवर आणले जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com