रिगनने घेतली तलाशाची ‘विकेट’

गोव्यातील क्रीडा क्षेत्रातील जोडी अडकली विवाह बंधनात
रिगन पिंटो व तलाशा प्रभू अडकले विवाहबांधनात
रिगन पिंटो व तलाशा प्रभू अडकले विवाहबांधनात Dainik Gomantak

Goa: गेल्या पाच सहा वर्षांपासून ‘त्याची’ मनं जुळली होती. ती आंतरराष्ट्रीय जलपरी तर तो क्रिकेटमधील गुगली बहाद्दर. दोघांनीही वेगवेगळ्या खेळात प्राविण्य मिळवले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचे नाव झळकाविले. हे दोन्ही खेळाडू गोव्यात लोकप्रिय आहेत. खेळातील ‘ब्रेक’ नंतर हे दोघेही एकत्र भेटले, ओळख घट्ट झाली आणि अखेर 26 ऑक्टोबर रोजी दोघांनी कायमचे एकत्र येण्याचा निर्णय घेतला. गोव्याची ‘ॲक्वा गर्ल’ तलाशा प्रभू (Aqua Girl Talasha Prabhu) हिने रिगन पिंटो (Crickter Reagan Pinto) याच्यासोबत विवाह नोंदणी (Register Marriage) केल्याची पोस्ट मंगळवारी शेअर केली आहे. त्यानंतर या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

रिगन पिंटो व तलाशा प्रभू अडकले विवाहबांधनात
गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचे पुनरागमन

रिगन पिंटो हा रणजीपटू. क्रिकेटबरेाबरच तो टेबल टेनिसपटूही आहे. शाळेत असताना त्याने बऱ्याच राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर तो क्रिकेटकडे वळला. गोव्याकडून प्रतिनिधित्व करताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 31 सामने खेळले. यामध्ये 154 धावांची सर्वोच्च खेळी आणि 9 बळींचा समावेश आहे. त्याने तीन शतकेही आपल्या नावावर नोंदवली आहेत. गोलंदाज म्हणूनही त्याचे योगदान आहे. क्रिकेटच्या ब्रेकनंतर त्याने टेबल टेनिसमध्ये पुनरागमन केले होते. राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी त्याची निवडही झाली होती. तलाशासोबत रिगनचे फोटो समाजमाध्यमावर नेहमी झळकत होते. या दोघांचेही खास फॉलोअर्स आहेत.

जलपरी म्हणून जिने नावलौकीक मिळवला ती तलाशा दिसायला सुंदर आणि मनमोहक. तिच्या अदाकारीने रिगनला आपलेसे केले. तलाशाने जलतरणात चार राष्ट्रीय विक्रम नोंदवले आहेत. तिने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर 21 वैयक्तिक स्पर्धाही जिंकलेल्या आहेत. 2010 मध्ये तलाशाने सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर राज्याचा प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई क्रीडा नैपुण्य पुरस्कारही पटकाविला आहे. भारतातील सर्वात वेगवान जलतरणपटू म्हणूनही तिने गौरव मिळवला आहे. 2009 ते 2013 या दरम्यान तलाशाने पाच आंतरराष्ट्रीय पदके मिळवली आहेत.

रिगन पिंटो व तलाशा प्रभू अडकले विवाहबांधनात
साळगावकर एफसीच्या खात्यात पूर्ण गुण

काही काळ मॉडेलिंगही

तलाशा उंचपुरी आणि दिसायला सुंदर असल्याने तिने जलतरणातील ब्रेकनंतर काही काळ मॉडेलिंगही केली. स्विमिंग करताना तिला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला सराव करता येत नव्हता. त्यावेळी तलाशाचे करिअर संपले, अशी चर्चाही सुरु झाली होती. तलाशा सोशल मीडियावर सक्रिय असून ती रिगनसोबतचे फोटो मोठ्या आनंदाने शेअर करते. विवाह नोंदणीचाही तिने फोटो शेअर केला असून ही जोडी नजर वेधून घेत आहे.

आम्ही 2016 मध्ये एकमेकांना भेटलो. नंतर हा सिलसिला चालूच राहिला. आम्ही आज पणजी येथे विवाह नोंदणी केली. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत.

- रिगन पिंटो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com