गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचे पुनरागमन

कोविड-19 महामारीमुळे गतवर्षी फुटबॉल स्पर्धा झाली होती रद्द
गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचा चषक
गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचा चषक Dainik Gomantak

Goa: कोविड-19 महामारीमुळे (Covide-19 Epidemic) गतवर्षी गोवा पोलिस कप फुटबॉल (Goa Police Football) स्पर्धा झाली नाही, आता वर्षभरानंतर जुनीपुराणी स्पर्धा राज्यातील फुटबॉल मैदानावर पुनरागमन करेल. स्पर्धेची सतरावी आवृत्ती 7 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत नियोजित आहे.

गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचा चषक
साळगावकर एफसीच्या खात्यात पूर्ण गुण

गोवा पोलिस क्रीडा विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, एकूण 14 संघांचा स्पर्धेत सहभाग असेल. यामध्ये गोवा प्रोफेशनल लीग व प्रथम विभागीय संघ आहेत. स्पर्धेचे सविस्तर वेळापत्रक 30 ऑक्टोबरला जाहीर होईल. स्पर्धेला गोवा फुटबॉल असोसिएशनची मान्यता आहे.

गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेचा चषक
...अखेर वकार युनूसला केलेल्या चुकीवर मागावी लागली माफी

स्पर्धेला 1968-69 मोसमात सुरवात झाली. पहिल्याच वर्षी वास्को स्पोर्टस क्लबने विजेतेपद मिळविले. 1978 नंतर स्पर्धेच्या आयोजनात अनियमितता आली. 2019 साली स्पर्धेचे शेवटच्या वेळेस आयोजन झाले. तेव्हा पेनल्टी शूटआऊटवर स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास हरवून एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने ही स्पर्धा प्रथमच जिंकली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com