Goa University
Goa UniversityDainik Gomantak

Goa University: साळगावकर कायदा, डॉन बॉस्को संयुक्त विजेते

महाविद्यालयीन महिला पॉवरलिफ्टिंग: ‘चौगुले’ची ऐव्हाना स्पर्धेतील ‘बलवान महिला’
Published on

Goa University गोवा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या महिलांच्या आंतरमहाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मिरामारचे व्ही. एम. साळगावकर कायदा महाविद्यालय व पणजीचे डॉन बॉस्को महाविद्यालयाने सांघिक विजेतेपद संयुक्तपणे प्राप्त केले. स्पर्धा ताळगाव पठारावरील विद्यापीठाच्या ज्युबिली हॉलमध्ये झाली.

फर्मागुढीचे पीईएस रवी एस. नाईक महाविद्यालय, आल्तिनोचे निर्मला इन्‍स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन, आल्तिनो येथील गोवा आर्किटेक्चर महाविद्यालय, मडगावचे पार्वतीबाई चौगुले महाविद्यालय, नुवे येथील कार्मेल महाविद्यालय, फर्मागुढीचे जीव्हीएम गोपाळ गोविंद पै रायतुरकर महाविद्यालय यांना संयुक्त तिसरा क्रमांक मिळाला.

मडगावच्या पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयाची ऐव्हाना डिमेलो स्पर्धेत ‘बलवान महिला’ किताबाची मानकरी ठरली. तिने 59.1 किलो वजनगटात भाग घेताना स्क्वॉट्स, बेंच प्रेच व डेड लिफ्ट या प्रकारात मिळून एकूण 327.5 किलो वजन पेलले.

Goa University
Triathlon Competition: गोव्यात पुढील महिन्यात ‘आयर्नमॅन 70.3’, 30 देशांतील ट्रायथलीट्सचा सहभाग

गोवा विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विष्णू नाडकर्णी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‍घाटन झाले. बक्षीस वितरण सोहळ्यास गोवा विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चोडणकर, विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा साहाय्यक संचालक भालचंद्र जदार यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com