Triathlon Competition: गोव्यात पुढील महिन्यात ‘आयर्नमॅन 70.3’, 30 देशांतील ट्रायथलीट्सचा सहभाग

ट्रायथलॉन स्पर्धा: 30 देशांतील ट्रायथलीट्सचा सहभाग निश्चित
Triathlon Competition
Triathlon CompetitionDainik Gomantak

Triathlon Competition: ‘आयर्नमॅन 70. 3 इंडिया’ ट्रायथलॉन स्पर्धा ऑक्टोबरमध्ये गोव्यात होणार असून राज्याच्या राजधानीत होणाऱ्या या प्रमुख स्पर्धेत 30 देशांतील ट्रायथलीट्स भाग घेतील.

येत्या आठ ऑक्टोबरला होणाऱ्या स्पर्धेत जलतरण, सायकलिंग व धावणे या तीन क्रीडा प्रकारांत चुरस असेल.

गोव्यात ही स्पर्धा तिसऱ्यांदा होत आहे. या स्पर्धेत स्पर्धकाची सहनशीलता, धैर्य, मानसिक आणि शारीरिक सामर्थ्याचा कस लागतो.

मिरामार समुद्रकिनारी 1.9 किलोमीटर जलतरण स्पर्धेने ‘आयर्नमॅन 70.3’ स्पर्धेला सुरवात होईल. त्यानंतर 90 किलोमीटर सायकलिंग व 21.1 किलोमीटर धावण्याची शर्यत असेल. सायकलिंग व धावण्याच्या शर्यतीस मिरामार सर्कल येथून सुरवात होईल.

तिन्ही क्रीडा प्रकारातील शर्यत एकत्रितपणे आठ तास व तीन मिनिटांत पूर्ण करावी लागेल. भारतासह ब्रिटन, अमेरिका, रशिया, बोलिव्हिया, दक्षिण आफ्रिका, अर्जेंटिना, एस्टोनिया, न्यूझीलंड या देशातील स्पर्धकांनी प्रवेशिका सादर केलेली आहे.

आयर्नमॅन 70.3 इंडिया ही केवळ ट्रायथलॉन स्पर्धा नसून सौहार्द व वैयक्तिक प्रगती वाढीस लावणारे माध्यम आहे, असे मत योस्काचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक राज यांनी व्यक्त केले.

देशांतर्गत स्पर्धकांत महाराष्ट्र, कर्नाटक व हरियानातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतून न्यूझीलंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयर्नमॅन 70.3 जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविता येईल.

Triathlon Competition
Goa Medical College: मृत्यूनंतरही दिले चौघांना जीवदान; 'गोमॅको'तून हृदय पाठवले चेन्नईला, यकृत दिल्लीला...

यापूर्वीचे विजेतेही सहभागी

गोव्यात यापूर्वी झालेल्या आयर्नमॅन 70. 3 इंडिया स्पर्धेत 2019 मध्ये बिश्वर्जीत सायखोम याने, तर 2022 मध्ये निहाल बेग याने विजेतेपद मिळविले होते.

यंदा बिश्वर्जीत सहभागी होणार असून त्याने प्रवेशिका सादर केली आहे. गतवर्षी या स्पर्धेत महिला गटात स्वित्झर्लंडची कॅटजिन शियरबीक विजेती ठरली होती.

Triathlon Competition
Goa Ganesh Chaturthi Festival: गणेश उत्सव समित्यांना दहशतवादविरोधी पथकाने दिल्या 'या' महत्वाच्या सूचना

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com