Goa Medical College: मृत्यूनंतरही दिले चौघांना जीवदान; 'गोमॅको'तून हृदय पाठवले चेन्नईला, यकृत दिल्लीला...

25 वर्षीय तरूणाच्या मृत्यूनंतर अवयवदान
Goa Medical College | organ donation
Goa Medical College | organ donationDainik Gomantak

Goa Medical College News: गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात मृत्यू झालेल्या एका 25 वर्षीय तरूणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चौघांचे प्राण वाचले आहेत. तरूणाच्या नातेवाईकांना दुःख काही काळ बाजूला ठेवत ठामपणे तरूणाच्या शरीरातील उपयोगी अवयव गरजूंना देण्याचा निर्णय घेतला.

Goa Medical College | organ donation
Girish Chodankar: अनेक मंदिरात बहुजन समाजाला गाभाऱ्यात प्रवेश नसतो; मुख्यमंत्र्यांनी यात बदल करावा...

यामध्ये या तरूणाचे हृदय चेन्नईतील एमएफएम रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर यकृत दिल्लीतील आर्मी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तर किडनी (मुत्रपिंड) गोवा मेडिकल कॉलेजसह हेल्थवे हॉस्पिटलमधील गरजुंना देण्यात आली.

गोमॅकोमध्ये या तरूणाचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याचवेळी चार ठिकाणांहून अवयव दानाची गरज भासली होती.

ही परिस्थिती या तरूणाच्या नातेवाईकांच्या कानावर घातले गेल्यानंतर तरूणाच्या नातेवाईकांना स्वतःचे दुःख बाजूला सारत या गरजू रूग्णांसाठी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्यानंतर हे अवयव संबंधित रूग्णालयांमध्ये पाठवले गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com