Goa Ranji Team : वैद्यकीय, तंदुरुस्ती चाचणीनंतर रणजी संघ अंतिम संभाव्य यादी

रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विनोद राघवन
Goa Cricket Team
Goa Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ranji Trophy : गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) २०२३-२४ मोसमातील रणजी करंडकासह सीनियर स्पर्धांच्या शिबिरासाठी २८ खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर केली. या खेळाडूंच्या वैद्यकीय, तसेच तंदुरुस्ती चाचणीनंतर संभाव्य खेळाडूंची अंतिम यादी जाहीर केली जाईल.

यासंबंधी माहिती जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी दिली. त्यामुळे सीनियर संभाव्य संघातील खेळाडूंची संख्या आणखी कमी होण्याचे संकेत आहेत.

आगामी मोसमासाठी जीसीएने रणजी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विनोद राघवन यांची, तर साहाय्यक प्रशिक्षकपदी प्रशांत शेट्टी यांची नियुक्ती केली आहे.

Goa Cricket Team
India vs Ireland T20I: टीम इंडियात पुन्हा नेतृत्व बदल? आयर्लंडविरुद्ध हार्दिक 'या' कारणामुळे न खेळण्याची शक्यता

त्यांनी आपल्या पदाचा ताबा स्वीकारला असून ते गोव्यात दाखल झाल्याची माहिती रोहन यांनी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय, तंदुरुस्ती चाचणीनंतर मोसमपूर्व शिबिरास सुरवात होईल.

गोव्याच्या रणजी करंडक संघात सध्या अर्जुन तेंडुलकर हा एकमेव पाहुणा क्रिकेटपटू आहे. नियमानुसार आवश्यकतेनुसार आणखी दोन पाहुणे क्रिकेटपटू निवडण्याची मुभा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com