Sesa Football Academy VS The Young Boys Of Tonk
Sesa Football Academy VS The Young Boys Of TonkDainik Gomantak

Goa Professional League: यंग बॉईज ऑफ टोंक संघाचा पहिल्याच लढतीत मोठा पराभव

4-0 फरकाने मात, क्लेन्सियो पिंटो सामन्याचा मानकरी
Published on

Goa Professional League Sesa Football Academy Win Match: गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या यंग बॉईज ऑफ टोंक (वायबीटी) संघाला सोमवारी पहिल्याच लढतीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. सेझा फुटबॉल अकादमी संघाने त्यांच्यावर 4-0 फरकाने मात केली. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

Sesa Football Academy VS The Young Boys Of Tonk
GHRDCच्या 370 जागांच्या थेट मुलाखतीसाठी हजारो उमेदवार; महामंडळाच्या नाकीनऊ, घेतला मोठा निर्णय

सेझा अकादमीचा क्लेन्सियो पिंटो सामन्याचा मानकरी ठरला. सामन्याच्या पूर्वार्धात वायबीटी संघाने चांगली झुंज दिली, त्यामुळे सेझा अकादमीला विश्रांतीला एका गोलच्या आघाडीवर समाधान मानावे लागले.

सामन्यातील पहिला गोल सामन्याच्या पहिल्याच मिनिटास व्हेलरोझ डायस याने नोंदविला. सामन्याच्या ४८व्या मिनिटास क्लेन्सियो याने गोल नोंदवत संघाची आघाडी २-० अशी वाढविली. चैतन दाभोळकर याच्या असिस्टवर या गोलची नोंद झाली.

Sesa Football Academy VS The Young Boys Of Tonk
Flights from Goa: आता गोव्यातून थेट अबू धाबीला कनेक्टिव्हिटी, चार दिवसात सुरु होणार विमानसेवा

तासाभराच्या खेळानंतर क्लेन्सियो याच्या शानदार असिस्टवर चैतन दाभोळकर याने सेझा अकादमीच्या खाती तिसऱ्या गोलची भर टाकली. ८५व्या मिनिटास श्रीधरनाथ गावस याने पेनल्टी फटक्यावर सेझा अकादमीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला.

यावेळी वायबीटी संघाच्या फ्रेझर व्हिएगस याने सेझा अकादमीच्या अमन याला पेनल्टी क्षेत्रात पाडले होते. स्पर्धेत मंगळवारी (ता. २९) गतविजेता धेंपो स्पोर्टस क्लब आणि स्पर्धेत पदार्पण करणारा आणखी एक संघ कुठ्ठाळी व्हिलेजर्स यांच्यात म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर लढत होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com