GHRDCच्या 370 जागांच्या थेट मुलाखतीसाठी हजारो उमेदवार; महामंडळाच्या नाकीनऊ, घेतला मोठा निर्णय

महामंडळाने 300 एमटीएस, 50 चालक आणि 20 स्टेनोग्राफर पदांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या.
Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDC
Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDCDainik Gomantak
Published on
Updated on

Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDC: राज्य मनुष्यबळ विकास महामंडळामार्फत दरवर्षी हजारो युवकांना अशाप्रकारच्या नोकऱ्या दिल्या जात आहेत. राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण ‘जीएचआरडीसी’मार्फत मिळणाऱ्या नोकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. याचे उदाहरण आज दिसून आले.

जीएचआरडीसीने आयोजित केलेल्या 370 पदांच्या मुलाखतीसाठी हजारो उमेदवारांनी हजेरी लावल्याचे चित्र आज दिसून आले. त्यामुळे महामंडळाने आजच्या मुलाखती रद्द केल्या असून पात्र उमेदवारांना टप्प्याटप्प्याने मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे.

Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDC
गोवा वनविभागाचे मोठे पाऊल, हवामान बदलाच्या माहितीसाठी 5 ठिकाणी बसवली अत्याधुनिक AWS सुविधा, देशातील पहिलेच राज्य

‘जीएचआरडीसी’कडून गेल्या काही वर्षांपासून राज्यातील सुशिक्षित युवक-युवतींना नोकऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्याचे काम सुरु आहे.

महामंडळाने 300 एमटीएस, 50 चालक आणि 20 स्टेनोग्राफर पदांच्या मुलाखती पर्वरी येथील कार्यालयात सोमवारी आयोजित केल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज हजारो उमेदवारांनी मुलाखतीसाठी कार्यालयात गर्दी केली होती.

Thousands Of Candidates For 370 Posts Of GHRDC
Ponda News: शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग; दोन महिन्यांनंतर गुन्हा दाखल

दरम्यान, महामंडळाने सोमवारच्या मुलाखती रद्द केल्या आहेत. आज उपस्थित उमेदवारांचे संपर्क क्रमांक महामंडळाने घेतले असून पात्र उमेदवारांना टप्प्याटप्प्याने मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातर्फे देण्यात आली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com