गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा उद्यापासून; या दोन संघात होणार पहिला सामना

गोवा प्रो-लीग फुटबॉल सामन्यांसाठी चाहत्यांना स्टेडियमवर प्रवेश
Goa Pro-League football tournament starts from tomorrow
Goa Pro-League football tournament starts from tomorrow Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (Goa Football Association) प्रो-लीग फुटबॉल (Pro-League Football) स्पर्धेस उद्यापासून सुरवात होणार आहे. म्हापसा (Mapusa) येथील धुळेर स्टेडियमवर गतविजेते स्पोर्टिंग क्लब द गोवा (Sporting Club The Goa) आणि पणजी फुटबॉलर्स (Panaji footballers) यांच्यात स्पर्धेतील पहिला सामना होईल.

Goa Pro-League football tournament starts from tomorrow
गोव्याची टी-20 आव्हानासाठी तयारी

जीएफएतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, यंदा सामन्यांसाठी स्टेडियमवर चाहत्यांना प्रवेश असेल. सामना पाहण्यास स्टेडियमवर येणाऱ्या फुटबॉलप्रेमींना कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचारांचे पालन करावे लागेल. महामारीमुळे गतमोसमात स्पर्धा रिकाम्या स्टेडियमवर झाली होती.

Goa Pro-League football tournament starts from tomorrow
Goa: धारगाळ क्रिकेट स्टेडियम प्रकल्पात 10 हजार चौरस मीटर जमीन सोडणे गरजेचे

स्पोर्टिंग क्लब, पणजी फुटबॉलर्ससह गतउपविजेता धेंपो स्पोर्टस क्लब, कळंगुट असोसिएशन, साळगावकर एफसी, वास्को स्पोर्टस क्लब, एफसी गोवा, चर्चिल ब्रदर्स, यूथ क्लब मनोरा, गार्डियन एंजल स्पोर्टस क्लब, वेळसाव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब व सेझा फुटबॉल अकादमी या बारा संघांत चुरस असेल. गतमोसमात सेझा अकादमी संघ तळात राहिला होता, पण कोविड-19 महामारीमुळे जीएफएने पदावनती नियम रद्द केला, त्यामुळे सेझा अकादमीचे 2021-22 मोसमासाठी स्पर्धेतील स्थान कायम राहिले. गतमोसमात स्पोर्टिंग क्लबने अपराजित कामगिरी नोंदवत विजेतेपद मिळविले होते. स्पर्धेतील पहिला टप्पा अकरा फेऱ्यांचा असेल, नंतर गतमोसमाप्रमाणेच अजिंक्यपद फेरी आणि पदावनती फेरी या धर्तीवर खेळली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com