Deodhar Trophy 2023: अर्जुन तेंडुलकर, मोहित रेडकर या गोव्याच्या खेळाडुंची दक्षिण विभाग संघात निवड

देवधर ट्रॉफी क्रिकेट एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ
Arjun Tendulkar | Mohit Redkar
Arjun Tendulkar | Mohit Redkar Dainik Gomantak
Published on
Updated on

Deodhar Trophy 2023: देशातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) शिबिरासाठी निवड झालेल्या अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) व मोहित रेडकर (Mohit Redkar) या गोव्याच्या खेळाडूंची आगामी प्रो. डी. बी. देवधर ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभाग संघात निवड झाली आहे.

एकदिवसीय सामन्यांच्या या स्पर्धेत कर्नाटकचा मयांक अगरवाल 15 सदस्यीय दक्षिण विभाग संघाचे नेतृत्व करेल. केरळचा रोहन कुन्नुम्मल उपकर्णधार आहे. दक्षिण विभाग निवड समितीची बैठक मंगळवारी पर्वरी येथील जीसीए अकादमी संकुलात झाली.

त्यानंतर दक्षिण विभाग निमंत्रक जीसीए सचिव रोहन गावस देसाई यांनी संघ जाहीर केला. स्पर्धा 24 जुलैपासून 3 ऑगस्टपर्यंत पुदुचेरी येथे खेळली जाईल. दक्षिण विभागासह उत्तर, पश्चिम, पूर्व, मध्य व ईशान्य विभाग संघ स्पर्धेत खेळतील.

Arjun Tendulkar | Mohit Redkar
Goa Tourism: 'ब्रँड गोवा'साठी सरसावला पर्यटन विभाग; देशातील 'या' 6 इव्हेंटमध्ये सहभागी होणार

इमर्जिंग खेळाडूंच्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मोहित भारत अ संघात राखीव खेळाडू होता. त्याला, तसेच सचिन तेंडुलकर पुत्र अर्जुन याला उदयोन्मुख खेळाडूंच्या शिबिरासाठी निवड झाल्याचे निकषावर देवधर ट्रॉफीसाठी संधी मिळाली आहे. मोहित ऑफस्पिनर असून अर्जुन डावखुरा वेगवान गोलंदाज आहे.

दक्षिण विभाग संघात गोव्याच्या दोघा खेळाडूंची निवड होणे ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. इमर्जिंग आशिया करंडकासाठी राखीव खेळाडू म्हणून निवड झालेल्या मोहित याला आता गुणवत्ता प्रदर्शित करण्याची एक चांगली संधी आहे.

गोव्याच्या दोन्ही खेळाडूंकडून आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, असे जीसीए सचिव रोहन यांनी सांगितले.

Arjun Tendulkar | Mohit Redkar
Goa Youth Congress Protest: गळ्यात बटाटे, टोमॅटोच्‍या माळा घालून निषेध; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मोर्चा

दक्षिण विभाग संघ

मयांक अगरवाल (कर्नाटक, कर्णधार), रोहन कुन्नुम्मल (केरळ, उपकर्णधार), एन. जगदीशन (तमिळनाडू), रोहित रायडू (हैदराबाद), अरुण कार्तिक (पुदुचेरी), देवदत्त पडिक्कल (कर्नाटक), रिकी भुई (आंध्र), वॉशिंग्टन सुंदर (हैदराबाद), व्ही. कावेरप्पा, व्ही. वैशाक, व्ही. कौशिक (तिघेही कर्नाटक), मोहित रेडकर (गोवा), सिजोमॉन जोसेफ (केरळ), अर्जुन तेंडुलकर (गोवा), साई किशोर (तमिळनाडू), राखीव ः साई सुदर्शन (तमिळनाडू), निकिन जोस (कर्नाटक), प्रदोष रंजन पॉल (तमिळनाडू), नीतिशकुमार रेड्डी (आंध्र), के. एस. भारत (आंध्र).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com