पणजी : कर्नल सी. के. नायडू करंडक (25वर्षांखालील) क्रिकेट (Cricket) सामन्यात गोव्याने दुसऱ्या दिवशी वर्चस्व गमावले, त्याचा लाभ उठवत उत्तर प्रदेशने बुधवारी 81 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. एलिट एफ गटातील लढतीत उत्तर प्रदेशने गोव्याच्या 179 धावांना उत्तर देताना पहिल्या डावात दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 260 धावा केल्या. काल पहिल्या दिवसअखेर त्यांची 4 बाद 25 अशी नाजूक स्थिती होती, मात्र बुधवारी उत्तर प्रदेशच्या फलंदाजांनी गोव्याचे गोलंदाज वरचढ ठरणार नाहीत याची दक्षता घेतली.
सलामीचा आंजनेय सूर्यवंशी याचे शतक आणि त्याने कर्णधार समीर चौधरी याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी केलेली 170 धावांची भागीदारी उत्तर प्रदेशसाठी निर्णायक ठरली. त्या बळावर त्यांनी गोव्याची धावसंख्या पार केली.
हिमाचल प्रदेशविरुद्ध (Himachal Pradesh) मागील लढतीत दुसऱ्या डावात 81 धावा केलेल्या आंजनेय याने 115 धावांची आक्रमक खेळी करताना 177 चेंडूंचा सामना केला. त्याने 13 चौकार व दोन षटकारही मारले. तुनीष सावकार याने ईशान गडेकर याच्याकरवी आंजनेयला झेलबाद करून जोडी फोडली. दिवसअखेर समीर चौधरी 83 धावांवर खेळत होता. त्याने 213 चेंडूंतील संयमी खेळीत दहा चौकार मारले. हिमाचल प्रदेशविरुद्ध 128 धावा केलेल्या उत्तर प्रदेशच्या कर्णधारास सलग दुसऱ्या शतकाची संधी आहे.
गोव्याच्या (goa) फिरकी गोलंदाजांना बुधवारी विकेट मिळाली नाही. त्यांच्यावर उत्तर प्रदेशच्या फलंदाजांनी आक्रमण केले. तुलनेत तुनीष सावकारने प्रभावी गोलंदाजी केली. काल तीन गडी बाद केलेला वेगवान गोलंदाज ऋत्विक नाईक याने दिवसातील काही षटके बाकी असताना आणखी एक गडी बाद केला, पण तोपर्यंत उत्तर प्रदेशची आघाडी वाढली होती.
संक्षिप्त धावफलक
गोवा, पहिला डाव : 179
उत्तर प्रदेश, पहिला डाव (4बाद 25वरून) ः 82.4 षटकांत 7 बाद 260 (आंजनेय सूर्यवंशी 115, समीर चौधरी 83, प्रिन्स यादव 24, आदित्य शर्मा 10, कृतग्य सिंग नाबाद 8, हेरंब परब 19-3-71-1, ऋत्विक नाईक 20-6-41-4, दीपराज गावकर 11.4-1-28-0, धीरज यादव 16-1-52-0, मोहित रेडकर 6-0-39-0, तुनीष सावकार 8-4-11-1, विश्वंबर काहलोन 2-0-12-0).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.