इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. काल सनरायझर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये राजस्थानने हैद्राबादवर दणदणीत विजय मिळवला. मात्र दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या (Rajasthan Royals) सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. एमसीए स्टेडियमवर मंगळवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात सनरायझर्सला रॉयल्सकडून 61 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (Kane Williamson was fined Rs 12 lakh for slow over rate in the match against Rajasthan Royals)
दरम्यान, "29 मार्च रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे खेळल्या गेलेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादला स्लो ओव्हर रेटसाठी दंड ठोठावण्यात आला आहे," असे आयपीएलने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
"आयपीएलच्या किमान ओव्हर रेटशी संबंधित आचारसंहितेनुसार या हंगामातील हा संघाचा पहिला गुन्हा आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे," असेही त्यात म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.