Goa: पेडे हॉकी स्टेडियमला ध्यानचंद यांचे नाव

Goa: मुख्यमंत्री सावंत यांची माहिती, महान हॉकीपटूस राज्य सरकारची मानवंदना
Goa: Hockey Stadium at Peddem-Mapusa in the final stages of construction.
Goa: Hockey Stadium at Peddem-Mapusa in the final stages of construction.Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजीः थोर हॉकीपटू मेजर ध्यानचंद (Major Dhyan Chand) यांच्या जन्मदिनी, राष्ट्रीय क्रीडादिनाचे औचित्य साधून गोव्याचे (Goa) मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी महान खेळाडूस मानवंदना दिली. पेडे-म्हापसा येथील हॉकी स्टेडियमला (Peddem-Mapusa Hockey Stadium) ध्यानचंद यांचे नाव देण्याची घोषणा त्यांनी रविवारी केली. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेनिमित्त पेडे-म्हापसा येथे गोवा क्रीडा प्राधिकरणातर्फे ॲस्ट्रो टर्फ हॉकी स्टेडियम बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे एकूण अंदाजपत्रक ५.५० कोटी रूपये आहे. स्टेडियमचे ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदान तयार असून ड्रेसिंग रूम, पॅव्हेलियन आदीर सुविधांचे बांधकाम बाकी आहे. त्यानंतर त्याचे औपचारिक उद्‍घाटन केले जाईल, त्यावेळी या स्टेडियमवर मेजर ध्यानचंद यांचे नाव झळकेल. गोव्यातील हे एकमेव हॉकी स्टेडियम आहे.

Goa: Hockey Stadium at Peddem-Mapusa in the final stages of construction.
Goa: पेडे हॉकी मैदानाचे काम अजूनही अपूर्णावस्थेत

पेडे क्रीडा संकुलातील ॲस्ट्रो टर्फ हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने गतवर्षी मान्यतेचे प्रमाणपत्र बहाल करताना ते जागतिक मैदान आवश्यकतेची पूर्तता करत असल्याचे नमूद केले होते. जागतिक हॉकी महासंघाच्या शिष्टमंडळाने गतवर्षी सप्टेंबरच्या सुरवातीस या हॉकी मैदानाची तपासणी केली होती. या प्रमाणपत्राची वैधता सप्टेंबर २०२३ पर्यंत आहे. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या खेलो इंडिया अभियानांतर्गत गोव्यात दोन ठिकाणी जिल्हा पातळीवर खेलो इंडिया केंद्र विकसित करण्यात मंजूरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पेडे-म्हापसा येथे हॉकी खेळासाठी पायाभूत सुविधा विकास साधला जाईल. फातोर्डा येथे फुटबॉलसाठी केंद्र असेल.

Goa: Hockey Stadium at Peddem-Mapusa in the final stages of construction.
पेडे हॉकी मैदानास आंतरराष्ट्रीय मान्यता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com