Chess Tournament : जर्मनीतील बुद्धिबळ स्पर्धेत गोमंतकीय ग्रँडमास्टर लिऑन विजेता

टायब्रेकर गुणांत लिऑन अव्वल ठरला व विजेतेपदाचा मानकरी बनला
Leon Luke Mendonca with the chess championship trophy
Leon Luke Mendonca with the chess championship trophyDainik Gomantak
Published on
Updated on

Chess Tournament : जर्मनीतील बाद वोएरिशोफेन येथे झालेल्या 38व्या चेसऑर्ग बुद्धिबळ महोत्सवात गोमंतकीय ग्रँडमास्टर लिऑन ल्युक मेंडोन्सा याने विजेतेपद मिळविले. स्पर्धेत त्याचे व ग्रँडमास्टर एन. आर. विशाख यांचे नऊ फेऱ्यांनंतर समान साडेसात गुण झाले.

टायब्रेकर गुणांत लिऑन अव्वल ठरला व विजेतेपदाचा मानकरी बनला. विशाखला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत भारतीय बुद्धिबळपटूंचे वर्चस्व राहिले.

लिऑन व विशाख यांच्यानंतर आठ खेळाडूंचे प्रत्येकी साडेसहा गुण झाले. त्यापैकी चौघे भारताचे होते. राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता इंटरनॅशनल मास्टरक पी. श्याम निखिल याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

Leon Luke Mendonca with the chess championship trophy
Mopa International Airport: आणि मनोहर विमानतळावर कोंकणीत झळकला बोर्ड, सरदेसाई म्हणतात अभिमान वाटतो...

पराक्रमी कामगिरी

चेसऑर्ग बुद्धिबळ महोत्सवाच्या 38 आवृत्त्यांच्या इतिहासात प्रथमच पहिले तीन क्रमांक भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळविले. हा स्पर्धेतील नवा विक्रम ठरला आहे. यापूर्वी मागील 37 स्पर्धांत एकाही भारतीय बुद्धिबळपटूस पोडियम फिनिश मिळाले नव्हते.

लिऑनचे वर्षभरातील दुसरे पोडियम

ग्रँडमास्टर लिऑनने या वर्षी दुसऱ्यांदा पोडियम मिळविताना चेसऑर्ग स्पर्धा जिंकली. आता तो स्लोव्हिनियास रवाना होईल. तेथे नोव्हा गॉर्सिया येथील २७व्या हिट ओपने स्पर्धेत भाग घेईल. त्या स्पर्धेच्या अ गटात लिऑनला अव्वल मानांकन असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com