Goa: सायकलिंग मार्गस्थ करण्यास `जीओए`चा पुढाकार

Goa: राज्यातील विविध सायकल क्लबची नोंदणी करणार
Goa : Cycling
Goa : CyclingDainik Gomantak/File Photo
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील सायकलिंग मार्गस्थ करण्यासाठी अखेर गोवा ऑलिंपिक असोसिएशनला (Goa Olympic Association) पुढाकार घ्यावा लागला आहे. राज्यातील विविध सायकल क्लबची नोंदणी करून त्यांना सामावून घेण्याचे सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवास (Cycling Association of Goa) बजावण्यात आले आहे. जीओए सचिव गुरुदत्त भक्ता यांनी सांगितले, की ``सायकलिंग असोसिएशन गोवाबाबत आम्हाला दखल घ्यावी लागली. काही क्लबनी सदस्यता मागितली आहे. त्यांना कायदेशीर बाबींची पूर्तता करून संघटनेचे सदस्यत्व देण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सायकलिंग क्लबकडून नोंदणीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संघटनेची चार ऑगस्ट रोजी म्हापशात आमसभा होईल, त्यावेळी अर्जांची छाननी करून क्लबच्या नोंदणी व सदस्यत्वावर शिक्कामोर्तब होईल.``

Goa : Cycling
Olympic Awareness Programme: पणजीतील दौडीत मुलांचा उत्साह

गोव्यात सायकलिंगच्या विकासासाठी आणि लोकप्रियतेसाठी वावरणारे बरेच सायकलिंग क्लब आहेत, पण त्यांना सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवाची मान्यता नाही. राज्य संघटनेचे सदस्यत्व मिळावी ही या क्लबची जुनी मागणी आहे, पण त्यास दाद दिली जात नसल्याचा या क्लबचा आरोप होता. याप्रकरणी जीओएने लक्ष घातले. त्यांनी चौकशी प्रक्रिया सुरू केली, तसेच हे प्रकरण हाताळण्यासाठी उपसमितीही नियुक्त केली, अशी माहिती सूत्राने दिली. नोंदणीसाठी जीओएने इच्छुक सायकल क्लबकडून मंगळवारपर्यंत (ता. 3) सदस्यत्व अर्ज मागविले आहेत. हे क्लब सोसायटी निबंधकाकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

Goa : Cycling
Goa: तब्बल सहा वर्षांचे क्रीडा पुरस्कार प्रलंबित

सप्टेंबर 2008 मध्ये स्थापना

सायकलिंग असोसिएशन ऑफ गोवाची स्थापना म्हापसा येथे सप्टेंबर 2008 मध्ये झाली. ही संघटना भारतीय सायकलिंग महासंघाशी संलग्न आहे. महासंघाच्या नोंदणीनुसार गोव्यातील संघटनेचे डॉ. नीतिश केरकर अध्यक्ष, तर एन. जी. अखारेकर सचिव आहेत. गोवा सायकलिंग असोसिएशनला जीओएने संलग्नता बहाल केलेली आहे, पण अजून गोवा क्रीडा प्राधिकरणाने पूर्ण सदस्यत्व बहाल केलेले नाही.

Goa : Cycling
गोव्याचे 'लेनी डिगामा' ऑलिंपिक बॉक्सिंगसाठी मूल्यांकनकर्ते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com