Goa Football: गोवा भारतातील 'फुटबॉल'चं माहेरघर कसं बनलं? काय असेल कारण? वाचा...

Goa Football History: गोवा हे भारतातील फुटबॉलचं माहेरघर असं मानलं जातं. क्रिकेटच्या वर्चस्वाखालील भारतात फुटबॉलचा सर्वाधिक उत्साह ज्या राज्यात दिसून येतो, ते म्हणजे गोवा राज्य.
Goa Football
Goa FootballDainik Gomantak
Published on
Goa Football
Goa FootballDainik Gomantak

फुटबॉलचं माहेरघर

गोवा हे भारतातील फुटबॉलचं माहेरघर असं मानलं जातं. क्रिकेटच्या वर्चस्वाखालील भारतात फुटबॉलचा सर्वाधिक उत्साह ज्या राज्यात दिसून येतो, ते म्हणजे गोवा राज्य. येथं फुटबॉल हा केवळ एक खेळ नसून संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

Goa Football
Goa FootballDainik Gomantak

ऐतिहासिक महत्त्व

16व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतावर राज्य केलं आणि त्यांनी फुटबॉलचा खेळ गोव्यात आणला. गोव्यातील स्थानिक संघांनी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केल्यानं 1960च्या दशकानंतर गोव्यात फुटबॉल अधिक लोकप्रिय झाला.

Goa Football
Goa FootballDainik Gomantak

फुटबॉल क्लब्स

गोव्यात अनेक प्रसिद्ध फुटबॉल क्लब्स आहेत. धेंपो स्पोर्ट्स क्लब, साळगांवकर एफसी, स्पोर्टिंग क्लब डी गोवा, चर्चिल ब्रदर्स एफसी हे गोव्यातील प्रसिद्ध फुटबॉल क्लब्स आहेत. तर एफसी गोवा (FC Goa) हा इंडियन सुपर लीग (ISL) मधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय क्लबपैकी एक आहे. वॉस्को स्पोर्ट्स क्लब हा गोव्यातील सर्वात जुना क्लब मानला जातो.

Goa Football
Goa FootballDainik Gomantak

फुटबॉल लीग

गोव्यात स्थानिक फुटबॉल लीग आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणावर खेळल्या जातात. ग्रामीण भागातही फुटबॉल मोठ्या आवडीनं खेळला जातो. शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं जातं.

Goa Football
Goa FootballDainik Gomantak

पहिला फुटबॉल सामना

1900 च्या दशकाच्या सुरुवातीला गोव्यात पहिली फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात आल्याची माहिती आहे. गोव्यातील पहिला फुटबॉल सामना पोर्तुगीज सैन्य आणि स्थानिक खेळाडूंमध्ये झाला, तर 1950 नंतर गोव्यात फुटबॉल लीग स्पर्धा अधिक प्रमाणात सुरू झाल्या.

Goa Football
Goa FootballDainik Gomantak

लोकप्रिय खेळ

गोव्याचा सर्वात लोकप्रिय आणि भावनिकदृष्ट्या जोडलेला खेळ म्हणजे फुटबॉल. फुटबॉल हा गोव्याच्या पोर्तुगीज वारशाचा एक भाग आहे आणि प्रत्येक गावात हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com