ग्लासगो: आर्तेम दॉवबिक याने जादा वेळेनंतरच्या भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे युक्रेनने स्वीडनला 2-1 असे पराजित केले आणि युरो फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. खरं तर या सामन्याचे चित्र एका आक्रमक टॅकलने बदलले.
नेदरलँड्सने ज्याप्रमाणे चेक प्रजासत्ताकविरुद्ध पराभव ओढवून घेतला. त्यावेळी मॅथिस डे लिग्त याने चेंडू हाताळण्याचा फटका डचांना बसला होता. त्यानंतर स्वीडनने 48 तासांनी स्वतःचे परतीचे तिकीट काढले, पण त्यात त्यांचा पूर्ण दोष नव्हता. मार्कस दॅनिएल्सनने जादा वेळेतील नवव्या मिनिटास युक्रेनच्या आक्रमकास रोखण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न शरीरवेधी होता, पण प्रतिस्पर्ध्यास जखमी करेल एवढा गंभीर असेल असे वाटले नव्हते.
मात्र प्रतिस्पर्धी जखमी झाल्याने दॅनिएल्सनला रेड कार्डमुळे मैदान सोडावे लागले आणि चित्र बदलले. जखमी झालेला आर्तेम बेसेदीन हा दहा मिनिटांपूर्वीच मैदानात आला होता. खरं तर निर्धारित वेळेत बरोबरी साधल्यानंतर स्वीडनने चांगला खेळ केला होता. चेंडू दोनदा गोलपोस्टवरून परतला होता. फिनिशिंग टच काही क्षण दूर आहे असेच वाटत होते. गोल होत नसल्याने स्वीडनने त्या टॅकलपूर्वी तीन आक्रमकांना मैदानात उतरवले होते. मात्र या टॅकलमुळे त्यांना खेळात बदल करावा लागला.
अशी झाली लढत
तपशील स्वीडन युक्रेन
चेंडूवर वर्चस्व ४६% ५४%
यशस्वी पास ५६६ ६८२
धाव (किमी) १४४.२ १४२.७
गोलचे प्रयत्न १३ १५
ऑन टार्गेट ३ ४
कॉर्नर ६ २
टॅकल्स ५ १८
फाऊल्स ११ ७
सुदैवी युक्रेन
युक्रेन एक प्रकारे नशीबवानच आहे. त्यांनी गटसाखळीत नेदरलँड्स तसेच ऑस्ट्रियाविरुद्धची लढत गमावली होती. उत्तर मॅसेडोनियाविरुद्धच्या विजयामुळे त्यांनी बाद फेरी गाठली.
क्वार्टर फाइनल लाइन-अप
स्विट्जरलैंड-स्पेन 2 जुलै
बेल्जियम-इटली 3 जुलै
चेक गणराज्य-डेनमार्क 3 जुलै
यूक्रेन बनाम इंग्लैंड 4 जुलै
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.