GCA Secretary Rohan Desai: 'बीसीसीआय'च्या दक्षिण विभाग निमंत्रकपदी गोवा क्रिकेट असोसिएशनचे रोहन देसाई बिनविरोध

2023-24 क्रिकेट मोसम; दुलिप, देवधर करंडक संघ निवड बैठकीचेही प्रमुख
GCA Secretary Rohan Desai
GCA Secretary Rohan DesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket Association's Secretary Rohan Desai: दक्षिण विभागीय क्रिकेट संघटनांच्या 2023-24 मोसमासाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांची निमंत्रकपदी बिनविरोध नियुक्ती झाली.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) स्पर्धांसाठी दक्षिण विभागीय संघ निवडण्याची जबाबदारी यंदा ‘जीसीए’कडे असेल.

GCA Secretary Rohan Desai
Steve Smith Century: स्मिथने भारताला शतकी दणका देत एक-दोन नाही तब्बल 5 मोठ्या विक्रमांना घातलीये गवसणी, एकदा पाहाच

दक्षिण विभागीय निमंत्रकपदी नियुक्ती झाल्याबद्दल ‘जीसीए’ व्यवस्थापकीय समितीने रोहन यांचे अभिनंदन केले आहे. आगामी दुलिप करंडक, तसेच प्रा. देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी दक्षिण विभागीय संघ निवड समितीची बैठक रोहन यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

याशिवाय 14 वर्षांखालील दक्षिण विभागीय स्पर्धा केंद्र ठरविण्याची जबाबदारीही ‘जीसीए’वर असेल. दक्षिण विभाग क्रिकेट संघटनांची आभासी पद्धतीने बैठक झाली, त्यावेळी रोहन यांच्या निवडीवर एकमताने शिक्कामोर्तब झाले.

दक्षिण विभागात गोव्यासह कर्नाटक, हैदराबाद, आंध्र, तमिळनाडू, केरळ व पुदुचेरी या क्रिकेट संघटनांचा समावेश आहे.

GCA Secretary Rohan Desai
WTC 2023 Final: भारताकडून 469 धावांवर ऑस्ट्रेलिया सर्वबाद! एका क्लिकवर पाहा सर्व 10 विकेट्स

दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धा 28 जून ते 16 जुलै या कालावधीत, तर देवधर करंडक एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा 24 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत खेळली जाईल. या दोन्ही स्पर्धेत मध्य, दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम व ईशान्य असे सहा संघ सहभागी होतील.

त्यापैकी दक्षिण विभागीय संघ निवडण्यासाठी बैठक बोलावण्याचा अधिकार रोहन यांच्याकडे असेल. गतवर्षीच्या दुलिप करंडक स्पर्धेत दक्षिण विभाग संघ उपविजेता ठरला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com