Chess tournament : गोव्याच्या मंदार लाडची अव्वल कामगिरी; जिंकले सुवर्णपदक

मंदार व अकरावा क्रमांक मिळविलेला राजवीर यांचे गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीतर्फे अभिनंदन
Mandar Laad
Mandar LaadDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Chess tournament : गोव्याच्या मंदार लाड याने राष्ट्रीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत 17 वर्षांखालील खुल्या गटात सुवर्णपदक जिंकले. स्पर्धा तमिळनाडूतील होसूर येथे 27 ते 31 जानेवारी या कालावधीत झाली.

फिडे मानांकनात 1776 एलो गुण असलेल्या मंदारने नऊ फेऱ्यांतून आठ गुणांची कमाई केली. त्याने सात डाव जिंकले, तर दोन डाव बरोबरीत राहिले. या स्पर्धेतील चमकदार कामगिरीने त्याच्या खाती 30 एलो गुणांची भर पडली. एकूण 71 खेळाडूंत मंदारला अव्वल मानांकन होते

Mandar Laad
Pakistan Cricket Board: पीसीबीचं नेमकं चाललं तरी काय! PAK संघाची जगभरातून उडवली जातेय खिल्ली

स्पर्धेत सहभागी गोव्याच्या अन्य खेळाडूंत 11 वर्षांखालील खुल्या गटात राजवीर पाटील याला अकरावा क्रमांक मिळाला. विविध वयोगटात गोव्याचे एकूण 26 बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. सुवर्णपदक विजेता मंदार व अकरावा क्रमांक मिळविलाला राजवीर यांचे गोवा बुद्धिबळ अस्थायी समितीने अभिनंदन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Lovelina Borgohain Gold Medal Asian Games 2026
India Second Gold Medal At Asian Games
Chigurupati Venkat Youth ODI Debut
Aarush Pawaskar World Junior Ranking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com