Goa: बुद्धिबळपटू भक्तीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

भारताने गतवर्षी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले. त्यावेळी भक्तीची प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. भक्तीने साखळी फेरीत सर्व तिन्ही सामने जिंकले.
गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.Dainik Gomantak

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने (All India Chess Federation) आगामी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी (National Sports Awards) गोव्याची (Goa) इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू (Chess player) भक्ती कुलकर्णी (Bhakti Kulkarni) हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. त्यास गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दुजोरा दिला.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँडमास्टर कोनेरू हंपी हिची खेलरत्न पुरस्कारासाठी, तर विदित गुजराथी, एम. आर. ललित बाबू, अधिबन भास्करन, एस. पी. सेतूरमण, पद्मिनी रोऊत व भक्ती कुलकर्णी यांची अर्जुन पुरस्कारासाठी, तर अभिजित कुंटे यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

गोव्याची इंटरनॅशनल मास्टर बुद्धिबळपटू भक्ती कुलकर्णी हिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
Goa Covid-19: रिकव्हरी रेट 96.92 टक्यांवर, 12 दिवसांत 1,99,918 गोवेकरांचे लसीकरण

गतवर्षी महत्त्वाची कामगिरी

भारताने गतवर्षी ऑलिंपियाड बुद्धिबळ स्पर्धेत रशियासह संयुक्त विजेतेपद मिळविले. त्यावेळी भक्तीची प्रथमच या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड झाली होती. भक्तीने साखळी फेरीत सर्व तिन्ही सामने जिंकले. भारताच्या ऑलिंपियाड यशाची दखल संसदेतही घेण्यात आली होती. नंतर आशिया नेशन्स कप स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला. त्या यशात मोलाचा वाटा उचलताना भक्तीने ११ डावात साडेसहा गुणांची कमाई केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com