International Chess Day: बुद्धिबळाच्या ‘चौरसा’त म्हामल-सारिपल्ली कुटुंब

International Chess Day: एकंदरीत म्हामल-सारिपल्ली कुटुंब बुद्धिबळात रंगले असून अनोखा योगायोग साधला आहे.
Mhamai-Saripalli Family
Mhamai-Saripalli FamilyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : अरविंद म्हामल गोमंतकीय बुद्धिबळात (Chess) तीन दशके खेळाडू-प्रशासक या नात्याने कार्यरत आहेत. ते गोव्यातील (Goa) बुद्धिबळात पहिले आंतरराष्ट्रीय आर्बिटर (International Arbiter). त्यांचा मुलगा अनुराग (Anurag) राज्यातील पहिला ग्रँडमास्टर (Grandmaster). म्हामल कुटुंबीयांचे बुद्धिबळातील एकमेवाद्वितीय ‘कनेक्शन’ इथेच संपत नाही. अरविंद यांची सून नंदिनी सारिपल्ली सुद्धा बुद्धिबळपटू असून माजी राज्यस्तरीय महिला विजेती आहे. नंदिनीचा भाऊ नीरजही माजी राज्य विजेता असून आई ज्योत्स्ना बुद्धिबळातील फिडे आर्बिटर (Fide Arbiter) आहे. एकंदरीत म्हामल-सारिपल्ली कुटुंब बुद्धिबळात रंगले असून अनोखा योगायोग साधला आहे.

Mhamai-Saripalli Family
Goa Sports: भक्तीचे आव्हान आटोपले

स्नेह कौटुंबीक बनला


म्हामल-सारिपल्ली कुटुंबीयांच्या बुद्धिबळातील आगळ्या ‘बाँडिंग’विषयी अरविंद म्हणाले, की ‘‘अनुराग व नंदिनी बरीच वर्षे एकत्रित बुद्धिबळ खेळत आहेत. बुद्धिबळात सक्रिय असतानाच त्यांचे सूर जुळले आणि आयुष्याच्या पटावर एकत्रित खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्हीही त्यास मान्यता दिली आणि म्हामल-सारिपल्ली कुटुंब बंधनात अडकले.

त्यापूर्वी बुद्धिबळपटू या नात्यानेच आमचा संबंध होता, तो स्नेह आता कौटुंबीक बनला.’’ अनुराग व नंदिनी गतवर्षी विवाह बंधनात अडकले. त्या दोघांची बुद्धिबळविषयक यू-ट्यूब चॅनेल आहे. त्या माध्यमातून बुद्धिबळ मार्गदर्शनाचा व्यापही अनुराग-नंदिनी सांभाळत आहेत. अनुरागचा मेहुणा नीरजही फिडे मानांकित राज्यातील प्रमुख बुद्धिबळपटू आहे. माजी राज्य विजेती ही नंदिनीची ओळख असली, तरी आई ज्योत्स्ना यांच्याप्रमाणे ती सुद्धा फिडे आर्बिटर आहे. हा सुद्धा अनोखा योगायोग आहे.

नंदिनी हिचे वडील व्यंकटरमण सारिपल्ली हे सुद्धा बुद्धिबळ जाणकार असून त्यांचे कुटुंबातील सदस्य बुद्धिबळ खेळत होते. व्यंकटरमण यांचे वडील गोवा बुद्धिबळ संघटनेचे पूर्वी ज्येष्ठ पदाधिकारी होते, अशी माहिती अरविंद यांनी दिली. या अफलातून ‘बाँडिंग’मध्ये फक्त अनुरागची आई भारती याच बुद्धिबळ संबंधित नाहीत.

बुद्धिबळात जल्लोष

अनुरागने 2001 पासून बुद्धिबळ खेळण्यास सुरवात केली. साधारणतः त्याच कालावधीत नंदिनी व नीरज सारिपल्ली भावंडेही राज्यस्तरीय बुद्धिबळात चमक दाखवत होते. अनुरागने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ बोर्ड गाजविण्यापूर्वी राज्य अजिंक्यपद स्पर्धेत दबदबा राखताना विजेतेपदाची मालिका गुंफली होती. नंदिनीने महिला गटात राज्य अजिंक्यपद जिंकले, तर नीरजनेही राज्य विजेतेपदाचा करंडक पटकावला.

Mhamai-Saripalli Family
Goa: बुद्धिबळ निवडणूक स्वच्छ,पारदर्शक हवी- महेश कांदोळकर

‘‘बुद्धिबळामुळे मानसिक शांती लाभते. एकाग्रता, संयम वृद्धिंगत होतो. महत्त्वाची बाब म्हणजे, सामाजिक जीवनात वावरताना आत्मविश्वास प्रबळ बनतो. नोकरीतील स्वेच्छा निवृत्तीनंतर मी आता ऑनलाईन बुद्धिबळ खेळतो. त्यामुळे सारा ताणतणाव दूर होतो. मन खूप शांत बनते," अरविंद म्हामल, आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ आर्बिटर म्हणाले.

बुद्धिबळातील म्हामल-सारिपल्ली कुटुंबीय
- 2017 साली अनुराग म्हामल गोव्याचा पहिला ग्रँडमास्टर
- 2019 साली अरविंद म्हामल गोव्यातील पहिले आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर
- नंदिनी आणि ज्योत्स्ना या दोघीही फिडे आर्बिटर
- अनुराग, नंदिनी, नीरज माजी राज्य अजिंक्यपद मानकरी

Mhamai-Saripalli Family
विश्वकरंडक महिला बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या डावात भक्तीची बरोबरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com