U15 Women Cricket: गोव्याने सिक्कीमला अवघ्या 31 धावांत गुंडाळले

गोव्याच्या चार्लोट लिसा हिच्या 7 धावांत 6 विकेट
U15 Women Cricket | Charlotte Lisa
U15 Women Cricket | Charlotte LisaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Under 15 Women Cricket: चार्लोट लिसा व कर्णधार हर्षिता यादव यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर गोव्याच्या 15 वर्षांखालील मुलींच्या क्रिकेट संघाने सिक्कीमचा डाव अवघ्या 31 धावांत गुंडाळला. त्यानंतर 2 विकेट गमावून विजयी लक्ष्य गाठत एकदिवसीय स्पर्धेतील पहिला विजय प्राप्त केला. सामना ग्वाल्हेर येथील मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या मैदानावर बुधवारी झाला.

U15 Women Cricket | Charlotte Lisa
Ranji Cricket: गोव्याविरोधात कर्नाटकचा 603 धावांचा डोंगर, मनीष पांडेचा द्विशतकी धमाका

लिसा हिने 7 धावांत 6, तर हर्षिताने 17 धावांत 4 विकेट घेतल्या. सिक्कीमच्या एकाही बॅटरला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एकवेळ त्यांची 8 बाद 16 धावा अशी नाजूक स्थिती होती. सोयता हिच्या नऊ धावांमुळे त्यांना तिशी पार करता आली.

संक्षिप्त धावफलक

सिक्कीम ः 13.1 षटकांत सर्वबाद 31 (हर्षिता यादव 7-2-17-4, चार्लोट लिसा 6.1-1-7-6) पराभूत वि. गोवा ः 9 षटकांत 2 बाद 32 (निखिला नाईक 14, यशिका गावडे 2, हर्षिता यादव नाबाद 13, रिया मालवणकर नाबाद 0, सबिता 2-8).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

India Wins Gold Medal in Asian Games Women Cricket 2026
India Women Cricket Team Enters Asian Games Final
Smriti Mandhana Highest Run Scorer Women T20
Chigurupati Venkat Youth ODI Debut
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com