All England Open 2023: सेमिफायनलमध्ये एन्ट्री करत लक्ष वेधणाऱ्या गायत्री-त्रिसाचं फायनलचं स्वप्न भंगलं!

ऑल इंग्लंड ओपन स्पर्धेत त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांना सेमीफायनलमध्ये पराभवाचा धक्का बसला आहे.
Gayatri Gopichand and Treesa Jolly
Gayatri Gopichand and Treesa JollyDainik Gomantak

Gayatri Gopichand and Treesa Jolly: इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताची महिला दुहेरीतील जोडी त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचे अंतिम सामन्यातील स्वप्न सलग दुसऱ्यांदा भंगले आहे. शनिवारी त्यांना उपांत्य फेरीतील सामन्यात कोरियाच्या बाएक हा ना आणि ली सो ही या जोडीने पराभूत केले.

46 मिनिटे चाललेल्या या सामन्यात गायत्री आणि त्रिसा यांच्या जोडीला 21-10, 21-10 अशा सरळ दोन सेटमध्येच पराभूत व्हावे लागले. बाएक हा ना आणि ली सो ही यांनी दोन्ही सेटमध्ये भारतीय जोडीवर पूर्ण वर्चस्व ठेवताना त्यांना पुनरागमनाची संधी दिली नाही. त्यामुळे गायत्री आणि त्रिसाला पराभवाचा सामना करावा लागला.

Gayatri Gopichand and Treesa Jolly
All England Championship 2023: ऑल इंग्लंडमध्ये भारताला मोठा धक्का, पीव्ही सिंधू पहिल्याच फेरीत बाहेर

गायत्री आणि त्रिसा यांनी शुक्रवारी ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपमध्ये चीनच्या की ली वेन मेई आणि लियू शुआन शुआन या जोडीला उपांत्य पूर्व फेरीत पराभूत करत सलग दुसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठली होती. यापूर्वी त्यांनी गेल्यावर्षी देखील या स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश करण्यात यश मिळवले होते.

दरम्यान, शनिवारी गायत्री आणि त्रिसा यांचा पराभव झाल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपले आहे. या स्पर्धेत भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत यापूर्वीच बाद झाले होते. तसेच सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीला राऊंड ऑफ 16 मध्येच पराभवाचा सामना करावा लागला.

Gayatri Gopichand and Treesa Jolly
New Zealand vs England: एमएस धोनीला बॅटिंगमध्ये भारी पडला किवी गोलंदाज, मोडलाय 'हा' मोठा रेकॉर्ड

दरम्यान आत्तापर्यंत भारताच्या केवळ प्रकाश पदुकोण आणि पुलेला गोपीचंद या खेळाडूंनाच मानाची ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकता आली आहे. त्यांच्याव्यतिरिक्त प्रकाश नाथ (1947), सायना नेहवाल (2015) आणि लक्ष्य सेन (2022) हे भारतीय खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत पोहचले होते, पण त्यांना विजेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com