लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची क्रिकेटची (Cricket) क्रेझ कोणापासून लपलेली नाही. क्रिकेटपटूंशी त्यांचे संबंध नेहमीच चांगले राहिले आहेत. त्या अनेकदा क्रिकेटपटूंशी संवाद साधताना दिसायच्या. भारताच्या गानकोकीळेचे सचिन तेंडुलकरसोबत आई-मुलाचे नाते होते. सचिनने त्याच्यासोबतच्या नात्याबद्दल अनेकदा आपल्या भावना व्यक्ते केल्या आहे. (LATA MANGESHKAR Noor Jehan)
1982 मध्ये भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला (Pakistan) गेला होता. तेव्हा त्याला 'क्रिकेट डिप्लोमसी' असे संबोधण्यात आले होते. पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेलेल्या या भारतीय संघाचे व्यवस्थापक होते बडोद्याचे महाराजा फतेहसिंह राव गायकवाड. फतेहसिंह राव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाकिस्तानातही मोठा प्रभाव होता. एका संध्याकाळी लाहोरमध्ये पार्टी होती. या पार्टीत गायकवाड स्वतः पाहुण्यांचे स्वागत करत होते. त्यांच्या बाजूला सुनील गावस्करही (Sunil Gavaskar) उभे होते.
तेवढ्यात लोकांच्या गर्दीतून एका आकर्षक महिलेने आत प्रवेश केला. तिच्या देहबोलीवरून ही आकर्षक महिला पाकिस्तानातील प्रमुख व्यक्तिमत्त्व असल्याचे दिसून आले. महाराज बडोदा यांनी त्यांचे स्वागत केले आणि सुनील गावसकर यांची ओळख करून दिली आणि म्हणाले, 'हे भारताचे कर्णधार आणि लोकप्रिय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आहेत.' तेव्हा ती महिला म्हणाली, 'आम्ही यांना ओळखत नाही. इम्रान आणि झहीर अब्बास यांना मी ओळखते. सुनील गावसकर यांना या महिलेने केलेला कुचकटपणा लक्षात आला. यानंतर महाराज बडोदा यांनी, या मलिका-ए-तरन्नम नूरजहाँ (Noor Jehan) तुम्ही त्यांना ओळखलेच असाल, असे म्हणत गावस्करांना त्यांची ओळख करून दिली. त्यावेळी मात्र गावस्करांचा भारतीय स्वाभिमान जागा झाला. आणि स्वाभिमानी 'सनी' लगेच उत्तर देत म्हणाले, 'नाही, आम्ही यांना ओळखत नाही, आम्ही फक्त लता मंगेशकर यांनाच ओळखतो.'
2020 च्या आसपासची ही गोष्ट आहे. 10 जुलै रोजी सुनील गावस्कर यांना 71 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला त्या विसरल्या होत्या. त्यानंतर गावस्कर यांच्याशी फोनवर बोलून त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. आज त्यांचा मृत्यू झाल्यापासून त्यांचे 2 वर्षांपुर्वीचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. आज या भारतरत्न गायीकेने वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.