Gautam Gambhir
Gautam GambhirDainik Gomantak

Gautam Gambhir: 'कोहली... कोहली' नारा ऐकताच गंभीरचा चढला पारा? भर मैदानात चाहत्यांना केले अश्लील हातवारे

Gautam Gambhir Video: आशिया चषक स्पर्धा सुरु असतानाच गौतम गंभीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published on

Gautam Gambhir Angry Video: भारत विरुद्ध नेपाळ संघात आशिया चषकातील सामना सोमवारी झाला. हा सामना सुरु असतानाच अचानक सोशल मीडियावर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरचा एक व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला. गंभीर सध्या आशिया चषकात समालोचक म्हणून काम करत आहे.

या व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की मैदानात पाऊस पडत असल्याने सामना थांबला आहे. याचवेळी गंभीर स्टेडियममधील पायऱ्या चढून फोनवर बोलत येत आहे. त्याचवेळी कोहली कोहली असा आवाज येत आहे. यानंतर अचानक गंभीरने अश्लील हातवारे केले.

दरम्यान, हा व्हिडिओ आशिया चषक स्पर्धेदरम्यानचा असला, तरी कोणत्या सामन्यावेळीचा आहे, हे स्पष्ट झाले नाही. मात्र, अनेक सोशल मीडिया युजर्सच्या अंदाजानुसार शनिवारी (२ सप्टेंबर) झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यानचा हा व्हिडिओ आहे. अनेक चाहत्यांच्या म्हणण्यानुसार गंभीर कोहलीच्या नावाच्या घोषणा दिल्याने चिडला.

Gautam Gambhir
Gautam Gambhir: विराट अन् धोनीबरोबर नाते कसे? गंभीरचा मोठा खुलासा; नवीनला पाठिंबा देण्याचं कारणंही सांगितलं

गंभीर आणि विराट यांच्यात 1 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्यादरम्यान आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान कडाक्याचे भांडण झाले होते. तो सामना बेंगलोरने जिंकला होता.

सामन्यानंतर विराट आणि गंभीर आमने-सामने आले होते. त्यांच्या वादानंतर बीसीसीआयने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही केली होती. याचमुळे विराट आणि गंभीर यांच्यातील संबंध फारसे चांगले नसल्याचे चाहत्यांचे मत आहे.

Gautam Gambhir
Virat Kohli Bowling: 'विराटला वाटतं तोच सर्वोत्तम बॉलर...', भुवीचा गमतीशीर खुलासा

दरम्यान, आशिया चषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास हा सामना कँडीमधील पाल्लेकेले क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पहिल्या डावानंतर रद्द झाला होता.

या सामन्यात सुरुवातीपासूनच पावसाची सातत्याने ये-जा सुरू होती. पण भारताचा डाव पूर्ण झाला. भारकाच्या 48.5 षटकात सर्वबाद 266 धावा झाल्या होत्या. भारताकडून इशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके केली. इशानने 82 धावांची आणि हार्दिकने 87 धावांची खेळी केली.

पाकिस्तानकडून शाहिन शाह आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तसेच हॅरिस रौफ आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. यानंतर पावसाचा जोर कायम राहिल्याने सामना रद्द झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com