F1 Champion Sebastian Vettel Retirement: जर्मनीचा फॉर्म्युला वन किंग सेबॅस्टियन वेटेल याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो सध्या अॅस्टन मार्टिनचा ड्रायव्हर आहे. चार वेळा फॉर्म्युला वन चॅम्पियन सेबॅस्टियन 2022 हंगामाच्या शेवटी निवृत्त होईल. या मोसमात तो शेवटच्या वेळी त्याच्या एफ वनसोबत रेसिंग ट्रॅकवर दिसणार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 53 वेळा रेसिंग ट्रॅकवर विजय मिळवला आहे. सेबॅस्टियनने 2007 मध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने अनेक वेळा आपली ताकद दाखवली.
दरम्यान, सेबॅस्टियन (Sebastian Vettel) हा फॉर्म्युला वनच्या जगातील सर्वोत्तम रेसर्सपैकी एक आहे. ग्रँड प्रिक्स विजयाच्या बाबतीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 53 सामने जिंकले आहेत. तर लुईस हॅमिल्टन (Lewis Hamilton) या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 103 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, मायकेल शूमाकर यामध्ये 91 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, सेबॅस्टियन चार वेळा फॉर्म्युला वनचा चॅम्पियन (Champions) ठरला आहे. 2010 ते 2013 पर्यंत तो चॅम्पियन होता.
दुसरीकडे, सेवानिवृत्तीची घोषणा केल्यानंतर सेबॅस्टियन म्हणाले, "गेल्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत मी अनेक अनुभवी स्पर्धक पाहिले. मी सर्वांचा आभारी आहे. मी गेल्या दोन वर्षांपासून अॅस्टन मार्टिन ड्रायव्हर आहे.''
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.