Virat Kohli: काय सांगता, इडनवर दिसणार 70 हजार विराट! 'किंग कोहली'साठी गांगुलीचा स्पेशल प्लॅन

India vs South Africa: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात 5 नोव्हेंबर रोजी वर्ल्डकप सामना होणार असून त्याचदिवशी विराटचा वाढदिवस आहे.
Virat Kohli | World Cup 2023
Virat Kohli | World Cup 2023BCCI

CAB has plan to distribute Virat Kohli masks to fans during India vs South Africa World Cup 2023 match:

भारतात सध्या वर्ल्डकप 2023 स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताला त्यांचा आठवा सामना 5 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्सला होणार आहे. विशेष म्हणजे याच सामन्याच्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीचा 35 वा वाढदिवस आहे.

त्यामुळे त्याचा वाढदिवस खास करण्याचा प्रयत्न बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (CAB) आहे. याबद्दल एक माहितीही समोर आली आहे की बंगाल क्रिकेट असोसिएशन या सामन्यावेळी विराटच्या चेहऱ्याच्या फोटोचे मास्क प्रेक्षकांना वाटणार आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी या सामन्याची जवळपास सर्व तिकीटे विकली गेली आहेत. त्यामुळे मैदानावर 70 हजार प्रेक्षक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दिवशी जवळपास ७० हजार लोक विराटचा मास्क घातल्याचे दिसू शकतात.

Virat Kohli | World Cup 2023
भारतातील World Cup 2023 ठरवणार कोणते संघ खेळणार पाकिस्तानमध्ये होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी

तसेच बंगाल क्रिकेट असोसिएशन भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी केकही कापण्याची आणि विराटचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करणार असल्याची योजना आखत आहे.

याबद्दल बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष स्नेहाशिष गांगुली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की 'आम्हाला आशा आहे की आम्हाला आयसीसीकडून यासाठी परवानगी मिळेल. आम्हाला विराटचा दिवस खास बनवायचा आहे.'

'आमची इच्छा आहे की विराट जेव्हा मैदानात येईल, तेव्हा स्टेडियममधील प्रत्येक चाहत्यांने त्याचा मास्क घालावा. आम्ही त्यादिवशी ७० हजार मास्क वाटण्याची योजना आखत आहोत.'

Virat Kohli | World Cup 2023
World Cup Points Table: जलवा हैं हमारा! टीम इंडिया विजयाचा सिक्सर लगावत 'अव्वल', तर गतविजेते गाळात

विशेष म्हणजे बंगाल क्रिकेट असोसिएशनने 2013 साली सचिन तेंडुलकर जेव्हा त्याचा 199 वा कसोटी सामना इडन गार्डन्सवर खेळला होता, त्यावेळीही त्याचा असाच सन्मान केला होता.

तथापि, वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळण्यापूर्वी 2 नोव्हेंबर रोजी मुंबईला वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारताने आत्तापर्यंत या स्पर्धेत 6 पैकी 6 सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ 12 गुणांसह सध्या गुणतालिकेत अव्वल क्रमांकावर आहे.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com