Ravi Shastri on Team India: शास्त्रींचा मोठा दावा, '2007 मधील धोनी ब्रिगेडच्या मार्गावरच हार्दिकची टीम इंडिया...'

साल 2024 मध्ये होणाऱ्या टी20 वर्ल्डकपच्या बाबतीत रवी शास्त्रींनी मोठे भाष्य केले आहे
Ravi Shastri
Ravi ShastriDainik Gomantak
Published on
Updated on

Ravi Shastri on Team India: ऑस्ट्रेलियामध्ये 2022 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपनंतर भारताच्या टी20 संघात काही महत्त्वाचे बदल होत असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या खेळाडूंना क्वचितच संधी मिळताना दिसत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पंड्याकडे भारताच्या टी20 संघाचे नियमित कर्णधारपद सोपवले जाण्याचीही चर्चा होत आहे.

अशातच आता भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे भाष्य केले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2024 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या टी२० वर्ल्डकपमध्ये भारताच्या संघात काही नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता शास्त्रींनी व्यक्त करताना म्हटले आहे की हा भारतीय संघ 2007 सारखी कामगिरी बजावू शकतो.

साल 2007 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये एमएस धोनीसारख्या तेव्हाच्या नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.

Ravi Shastri
IPL Viral Video: विषय हार्ड! पठ्ठ्यानं स्टेडियममध्ये जाऊनही मॅच पाहिली मोबाईलवरच, तेही आरामात झोपून

इएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना शास्त्री म्हणाले, 'मला वाटते की ते नव्या खेळाडूंना संघात संधी देतील. टी20 वर्ल्डकप येत आहे आणि युवा खेळाडूंमध्ये खूप प्रतिभा आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्येही आपण काही चांगले प्रतिभावान खेळाडू पाहिले. हा पूर्ण नवा संघ नसेल, पण या संघात अनेक नवे चेहरे असतील. हार्दिक या प्रकारात आधीपासूनच भारताचा कर्णधार आहे. जर फिटनेसच्या काही समस्या उद्भवल्या नाही, तर तो संघाचा कर्णधार म्हणून कायम राहिल.'

तसेच शास्त्री म्हणाले, 'भारतीय संघ व्यवस्थापन पुन्हा 2007 टी20 वर्ल्डकपच्या मार्गावर चालेल. ते प्रतिभा ओळखतील आणि त्यांच्याकडे पर्यायांचीही कमी नसेल. अशा खेळाडूंचाही पर्याय असेल, जे आयपीएल संघांचे कर्णधार राहिले आहेत.'

Ravi Shastri
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने शिखर धवनला केलं किस, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

तसेच शास्त्री यांनी असेही म्हटले आहे की हार्दिकच्या बाबतीत वर्कलोडची समस्याही उद्भवण्याची शक्यता कमी आहे. ते म्हणाले, 'सध्या हार्दिकच्या बाबतीत वर्कलोडची कोणतीही समस्या नाही. आयपीएल आणि वनडे वर्ल्डकपच्या दरम्यान भारतीय संघ चार - पाच सामनेच खेळेल. त्याचबरोबर तो कसोटी संघाचाही भाग नाही. त्यामुळे कसोटी मालिकेवेळी त्याला विश्रांतीची संधी मिळेल.'

टी20 वर्ल्डकर 2024 स्पर्धा कॅरेबियन बेटांवर म्हणजेच वेस्ट इंडिजमध्ये आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com