Messi - Ronaldo: लहानग्या फॅननं 'मेस्सीच सर्वोत्तम' म्हणताच 'अशी' होती रोनाल्डोची रिऍक्शन, पाहा Video

रोनाल्डो समोरच मेस्सी सर्वोत्तम असल्याचे एका लहान चाहत्याने ओरडून सांगितले होते, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
Cristiano Ronaldo
Cristiano RonaldoDainik Gomantak

Cristiano Ronaldo: फुटबॉल विश्वात पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी दिग्गज खेळाडूंमध्ये गणले जातात. तसेच हे दोघेही एकमेकांचे कट्टर प्रतिद्वंद्वी देखील आहे. या दोघांच्याही चाहत्यांमध्ये नेहमीच कोण सर्वोत्तम आहे, याबद्दल वाद घडताना दिसत असतात.

दरम्यान, नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात एक लहान मुलगा रोनाल्डोसमोरच मेस्सी त्याच्यापेक्षा उत्तम असल्याचे म्हणत आहे. ही घटना शुक्रावारी अल-नासर विरुद्ध अल-बातेन संघात झालेल्या सामन्यानंतर घडली.

Cristiano Ronaldo
Cristiano Ronaldo Video: अल-नासरसाठी रोनाल्डोची तीन सामन्यात दुसरी हॅट्रिक, पाहा कसे केले गोल

सध्या रोनाल्डो अल-नासर संघाचा भाग असून सौदी प्रो लीगमध्ये खेळत आहे. त्याने या संघासाठी पहिल्या तिन्ही सामन्यांत चांगली कामगिरी केली होती. त्याने या तीन सामन्यांपैकी 2 सामन्यात हॅट्रिकही साधली. मात्र, शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याला एकही गोल करता आला नाही. पण अल-नासरला हा सामना भरपाई वेळेत 3 गोल केल्याने 3-1 अशा गोलफरकाने जिंकता आला.

दरम्यान, हा सामना संपल्यानंतर रोनाल्डो मैदानातून लॉकर रुमकडे जात असताना एक लहान मुलगा जोरात ओरडला, 'मेस्सी हा खूप चांगला आहे.' यानंतर रोनाल्डोने त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केल्याचे दिसले, पण तो नंतर 'हा सोपा सामना होता' असे ओरडत ज्याप्रकारे हा सामना संपला, त्यावर निराशा स्पष्ट करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत असून अनेक चाहत्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे.

(Young child shouting in front of Cristiano Ronaldo that Lionel Messi is a better player)

Cristiano Ronaldo
FIFA World Cup विजयाचं कौतुक! Messi कडून जगज्जेत्या अर्जेंटिना टीमसाठी सोन्याचे आयफोन गिफ्ट, Photo Viral

अल-नासरने जिंकला सामना

शुक्रवारी झालेल्या सामन्यात अल-बातेनने पहिल्याच हाफमध्ये पहिला गोल नोंदवला होता. त्यांच्याकडून 17 व्या मिनिटाला रेंझो लोपेजने पहिला गोल नोंदवला होता. पण, सामन्याच्या निर्धारित वेळेल अल-नासरला एकही गोल करता आला नव्हता.

त्यामुळे हा सामना अल-बातेन जिंकेल असे अनेकांना वाटले होते. मात्र भरपाई वेळेत अल-नासरकडून अब्दुरेमान घरीब, मोहम्मद अल-फातील आणि मोहम्मद मारन यांनी गोल करत संघाला विजय मिळवून दिला.

आता अल नासरचा पुढील सामना गुरुवारी ९ मार्चला अल-इत्तिहादविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com