Cricket Fixing: क्रिकेटवर अजूनही घोंघावतेय फिक्सिंगचे वादळ! 13 सामने संशयाच्या भोवऱ्यात

साल 2022 मधील 13 क्रिकेट सामन्यांवर एका अहवालात संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Cricket
Cricket Dainik Gomantak
Published on
Updated on

Cricket Fixing: क्रिकेटमधून अद्यापही फिक्सिंग पूर्णपणे संपलेले नाही. अजूनही क्रिकेटवर फिक्सिंगचे संकट घोंगावत आहे. असे नुकतेच समोर आलेल्या एका रिपोर्टमधून दिसून आले आहे.

साल 2022 मध्ये खेळवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांपैकी 13 सामने संशयाच्या भोवऱ्यात अडकले असल्याचे स्पोर्टरडार इंटिग्रिटी सर्विसेसने प्रकाशित केलेल्या एका समीक्षा अहवालात म्हटले आहे.

स्पोर्टरडार इंटिग्रिटी सर्विसेस ही एक आंतरराष्ट्रीय तज्ञांची टीम असून ते खेळांमधील अनियमित बेटींग, फिक्सिंग आणि भ्रष्टाचाराची समीक्षा करतात. ही कंपनी क्रीडा सामन्यांमधील शंशयास्पद हलचाली ओळखण्यासाठी युनिवर्सल फ्रॉड डिटेक्शन सिस्टिमचा वापर करते.

त्यांनी नुकताच 2022 वर्षातील क्रीडा सामन्यांबद्दल 28 पानांचा एक अहवाल सादर केला आहे. ज्याचे नाव बेटिंग, करप्शन आणि मॅच फिक्सिंग असे ठेवण्यात आले आहे. या अहवालानुसार 2022 मध्ये 92 देशांतील 12 क्रीडा प्रकारातील 1212 सामने संशायस्पद आहेत.

Cricket
IPL 2023 पूर्वी गुजरात टायटन्सची घोषणा, हार्दिक पांड्यानंतर 'हा' खेळाडू होणार कर्णधार!

यामध्ये सर्वाधिक फुटबॉलमध्ये भ्राष्टाचार झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. 775 फुटबॉल सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असून शकतो असे म्हटले आहे. त्यानंतर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बास्केटबॉल असून 220 सामन्यांवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय 75 लॉन टेनिस सामन्यांवरही संशय आहे.

तसेच 12 क्रीडा प्रकारांमध्ये क्रिकेट सहाव्या क्रमांकावर असून 2022 वर्षात 13 सामन्यांमध्ये भ्रष्टाचार झाला असू शकतो, असा संशय आहे.

दरम्यान, या अहवालात म्हटले आहे की जरी अन्य क्रीडा प्रकारांच्या तुलनेत क्रिकेटमधील संशयास्पद सामन्यांची संख्या तुलनेने कमी दिसत असली तरी, 13 संशयास्पद क्रिकेट सामने स्पोर्टडार इंटिग्रिटी सर्व्हिसेसने नोंदवलेला सर्वोच्च वार्षिक आकडा आहे. क्रिकेट व्यतिरिक्त हँडबॉल आणि फुटसल या क्रीडा प्रकारातही आतापर्यंतच्या सर्वाधिक संशयास्पद सामन्यांची नोंद केली आहे.

Cricket
IPL 2023 पूर्वी जड्डू अन् कॅप्टनकूलची दिसली 'दोस्ती'! फॅन्सचं मन जिंकणारा Video व्हायरल

पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की या अहवालानुसार संशयास्पद असलेल्या 13 क्रिकेट सामन्यांपैकी एकही सामना भारतात खेळण्यात आलेला नाही.

दरम्यान, 2020 मध्ये बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी युनिटबरोबर स्पोर्टरडारने भागीदारी केली होती, जेणेकरून आयपीएल सामन्यांमधील अनियमित बेटींगचा तपास करता येईल.

बीसीसीआयने 31 मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेसाठीही फिक्सिंगसारख्या गोष्टींपासून दूर राहण्यासाठी काही कडक पाऊले उचलली असल्याचे म्हटले जात आहे. बीसीसीआयने आयपीएल 2023 दरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी बोलण्यास मनाई केली असून त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com