MS Dhoni on CSK Defeat: 'पहिला बॉल पडला तेव्हाच...', KKR विरुद्धच्या पराभवानंतरचे धोनीची प्रतिक्रिया चर्चेत

रविवारी कोलाकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
MS Dhoni
MS DhoniDainik Gomantak
Published on
Updated on

MS Dhoni on CSK Defeat: रविवारी (14 मे) इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानावर म्हणजेच एमएस चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर पराभूत केले. कोलकाताने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला. पण या पराभवासाठी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने कोणालाही दोष दिला नाही.

धोनीने या सामन्यानंतर दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. या सामन्यात खरंतर धोनीने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हाच निर्णय चूकीचा ठरला असल्याचे धोनीने मान्य केले.

MS Dhoni
Samantha on MS Dhoni: 'धोनीच्या डोक्यात घुसून...', CSK च्या थालाबद्दल समंथाने दिली अनोखी प्रतिक्रिया

सामन्यानंतर धोनी म्हणाला, 'हा असा दिवस होता, जेव्हा तुम्ही नाणेफेक जिंकता आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेता. पण दुसऱ्या डावातील पहिलाच चेंडू पडल्यानंतर तुम्हाला जाणवतं की ही खेळपट्टी 180 च्या आसपास धावांची आहे. मला वाटते की दवामुळे (dew) मोठा फरक पडला.'

'जर तुम्ही पहिल्या आणि दुसऱ्या डावाची तुलना केली, तर पहिल्या डावात फिरकीपटूंना मोठी मदत मिळाली, पण दुसऱ्या डावात तशी परिस्थिती नव्हती. जेव्हा नाणेफेकीवेळी दवाबद्दल कोणतीही खात्री नसती, तेव्हा थोडे कठीण होते.'

धोनी पुढे म्हणाला, 'मी जसं म्हटलो की जरी तुम्ही नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी घेतली आणि मग तुम्हाला जाणवतं की मैदानात दुसऱ्या डावात दव नाही, तर त्यांच्याही फिरकीपटूंविरुद्ध 150 धावा करणे कठीण होते.'

'त्यामुळे आम्ही कोणत्याही फलंदाजाला किंवा गोलंदाजाला या पराभवाबद्दल दोषी ठरवू शकत नाही. त्यांची त्यांचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला, पण वातावरणाचा सामन्यावर मोठा प्रभाव पडला.'

MS Dhoni
MS Dhoni: जेव्हा कॅप्टनकूल भडकतो...! CSK च्या युवा खेळाडूला भर सामन्यात धोनीने सुनावलं

चेन्नईचा पराभव

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना  20 षटकात 6 बाद 144 धावा केल्या होत्या. चेन्नईकडून शिवम दुबेने 34 चेंडूत सर्वाधिक 48 धावा केल्या. तसेच डेवॉन कॉनवेने 30 धावा केल्या. कोकाताकडून वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. 

त्यानंतर 145 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने सुरुवातीला 3 विकेट्स झटपट गमावल्यानंतर रिंकू सिंग आणि कर्णधार नितीश राणा यांनी 99 भागीदारी केली. त्यामुळे कोलकाताने हे आव्हान 18.3 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पूर्ण केले.

रिंकूने 43 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तसेच राणा 44 चेंडूत 57 धावा करून नाबाद राहिला.  चेन्नईकडून दीपक चाहरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com