रविवारी इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरला 30 लाख रुपयांना विकत घेतले. 22 वर्षीय अर्जुनलाही मुंबईने गेल्या वर्षी त्याच्या मूळ किंमत 20 लाख रुपयांसाठी निवडले होते. मात्र यावेळी अर्जुन तेंडुलकर लिलावात विकला गेल्याने टीकाकारांच्या निशाण्यावर होता. सचिन तेंडुलकरचा मुलगा असल्याने त्याला संधी मिळत असल्याचे अनेकांचे मत आहे. युवा अष्टपैलू खेळाडू अर्जुन तेंडुलकरवरही घराणेशाहीचे आरोप झाले आहेत.
अर्जुनने आतापर्यंत भारत अंडर-19 (Under-19) आणि मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट सामने खेळला आहे. पण आता महान सचिन तेंडुलकरने खुलासा केला आहे की, तो आपल्या मुलाला खेळताना पाहत नाही कारण अर्जुनने कोणत्याही दबावाशिवाय खेळाच्या प्रेमात पडावे अशी त्याची इच्छा आहे.
ग्रॅहम बेन्सिंगरशी झालेल्या संवादात सचिनने (Sachin Tendulkar) सांगितले की, अर्जुन जेव्हा खेळायला जातो तेव्हा तो लपून राहणे पसंत करतो. त्याची हालचाल त्याच्या मुलाच्या प्रशिक्षकाला माहीत नाही.
सचिन म्हणाला, "वडील आणि आई, जेव्हा ते आपल्या मुलांना खेळताना पाहतात तेव्हा ते तणावात पडतात आणि म्हणूनच मी अर्जुनला पाहायला जात नाही, कारण मला त्याला क्रिकेटवर प्रेम करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे - त्याला हवे तसे लक्ष केंद्रित करावे. मी त्याला खेळायतांना बघायला जात नाही.
तो पुढे म्हणाला की, “त्याला खेळावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मला कोणी बघाव हे मला आवडलं नाही. मी जेव्हा त्याचा खेळ पाहतो तेव्हा मी कुठेतरी लपून बसतो. त्याला, प्रशिक्षकाला किंवा कोणालाच हे माहीत नाही की मी तिथे आहे."
डावखुरा गोलंदाज आणि फलंदाज असलेल्या अर्जुनने गेल्या वर्षी हरियाणाविरुद्ध (Haryana) सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत मुंबईकडून पदार्पण केले होते. त्याने तीन षटकात 34 धावा देत एक विकेट घेतली.
अर्जुन यावर्षी मुंबई इंडियन्स कॅम्पचा (Mumbai Indians) भाग असेल, ज्यामध्ये अनेक डावखुऱ्या गोलंदाजांचा समावेश आहे. पाच वेळच्या चॅम्पियनमध्ये डावखुरा वेगवान गोलंदाज टायमल मिल्स आणि जयदेव उनाडकट यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा डॅनियल सॅम्सही संघात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.