FIFA World Cup 2026 Schedule: रोनाल्डो, मेस्सी आणि एमबाप्पे...फुटबॉल विश्वातील दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार; येथे पाहा सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक

Fifa World Cup 2026 Day 6 Schedule: फिफा वर्ल्ड कप 2026 मधील थरार आता शिगेला पोहोचला असून, जगभरातील फुटबॉल प्रेमींचे लक्ष आता अशा संघांवर लागले आहे.
FIFA World Cup 2026 schedule
FIFA World Cup 2026 scheduleDainik Gomantak
Published on
Updated on

Fifa World Cup 2026 Day 6 Schedule: फिफा वर्ल्ड कप 2026 मधील थरार आता शिगेला पोहोचला असून, जगभरातील फुटबॉल प्रेमींचे लक्ष आता अशा संघांवर लागले आहे ज्यांच्याकडून जेतेपदाच्या सर्वाधिक अपेक्षा आहेत. स्पर्धेच्या सहाव्या दिवशी फुटबॉल विश्वातील अनेक मोठे संघ आपले सत्व पणाला लावणार आहेत. यामध्ये विद्यमान विश्वविजेता अर्जेंटिना आपल्या जेतेपद राखण्याच्या मोहिमेची सुरुवात करेल, तर माजी विजेती फ्रान्सची टीमही विजयाने सुरुवात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

याशिवाय, दिवसाच्या शेवटच्या सामन्यात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ कांगोविरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे फुटबॉल चाहत्यांना एकाच दिवशी अनेक हाय-व्होल्टेज सामन्यांचा थरार अनुभवता येणार आहे. या दिवशी ग्रुप 'I' आणि ग्रुप 'J' मधील संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळेल.

FIFA World Cup 2026 schedule
FIFA World Cup 2026: सामना संपताच डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले...! स्पेनला रोखणारा 'हा' गोलकीपर रातोरात बनला जागतिक स्टार; 50 लाख फॉलोअर्स वाढले

दिवसाची सुरुवात फ्रान्स आणि सेनेगल यांच्यातील सामन्याने होईल. युरोपियन फुटबॉलमधील बलाढ्य मानला जाणारा फ्रान्सचा संघ सेनेगलविरुद्ध मैदानात उतरुन स्पर्धेत विजयी सलामी देण्याचा प्रयत्न करेल. मात्र, आफ्रिकन उपविजेत्या सेनेगल संघाला कमी लेखून चालणार नाही, ज्यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. हा सामना न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार 17 जून रोजी मध्यरात्री 12:30 वाजता खेळवला जाईल. त्यानंतर ग्रुप 'I' मधील दुसऱ्या सामन्यात इराक आणि नॉर्वे हे संघ आमनेसामने असतील. बोस्टन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाने सुरुवात करण्यासाठी उत्सुक असून हा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 3:30 वाजता सुरु होईल.

FIFA World Cup 2026 schedule
FIFA World Cup 2026: फिफा विश्वचषकात जर्मनीचा नवा इतिहास; कुरासाओचा 7-1 ने धुव्वा उडवत ब्राझीलचा 'तो' मोठा रेकॉर्ड मोडला

फुटबॉल (Football) चाहत्यांसाठी दिवसातील सर्वात मोठा आणि बहुप्रतिक्षित सामना अर्जेंटिना आणि अल्जीरिया यांच्यात रंगणार आहे. विद्यमान जागतिक विजेता अर्जेंटिना पुन्हा एकदा आपले जेतेपद राखण्याच्या मुख्य उद्देशाने मैदानात उतरत आहे. जगभरातील चाहत्यांच्या नजरा या सामन्यावर खिळल्या असतील, कारण फुटबॉलचा महानायक लिओनेल मेस्सी पुन्हा एकदा वर्ल्ड कपच्या मंचावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे.

कॅन्सस सिटी स्टेडियमवर होणारा हा महामुकाबला भारतीय वेळेनुसार 17 जून रोजी सकाळी 6:30 वाजता खेळवला जाईल. यानंतर ग्रुप 'J' मधील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रिया आणि जॉर्डन यांच्यात लढत होईल. बाद फेरीच्या (नॉकआउट) शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे असून सॅन फ्रान्सिस्को बे एरिया स्टेडियमवर सकाळी 9:30 वाजता हा सामना सुरु होईल.

FIFA World Cup 2026 schedule
FIFA World Cup 2026: नेमारच्या खेळण्यावर अखेर शिक्कामोर्तब, मैदानावर दिसणार 'नेमार मॅजिक'! ब्राझीलचा संघ जाहीर, प्रतिस्पर्ध्यांचं टेन्शन वाढलं

दिवसाचा शेवटचा आणि तितकाच रोमांचक सामना पोर्तुगाल आणि कांगो (Congo) यांच्यात खेळवला जाईल. पोर्तुगालचा संघ जेव्हा कांगोविरुद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी उतरेल, तेव्हा जगातील महान फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. ह्युस्टन स्टेडियमवर होणारा पोर्तुगाल विरुद्ध कांगो हा सामना भारतीय वेळेनुसार 17 जून रोजी रात्री 10:30 वाजता सुरु होईल. एकूणच, हा दिवस जागतिक फुटबॉलमधील सुपरस्टार्सच्या आगमनाने चाहत्यांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com