FIFA World Cup: अर्जेंटिनाला मोठा धक्का, हे दोन स्टार खेळाडू फिफा वर्ल्ड कपमधून आऊट

Argentina: जोआक्विन कोरियाची जागा टियागो अल्माडा घेईल.
Nicolas Gonzalez and Joaquin Correa
Nicolas Gonzalez and Joaquin CorreaDainik Gomantak

Qatar FIFA World Cup 2022: फिफा वर्ल्ड कप 2022 च्या आधी अर्जेंटिनासाठी एक धक्का देणारी बातमी आली आहे. स्टार फुटबॉलपटू निकोलस गोन्झालेझ आणि जोआकिन कोरिया हे दुखापतीमुळे फिफा विश्वचषक 2022 मधून बाहेर पडले आहेत. अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनने (एएफए) ही माहिती दिली आहे. आता अ‍ॅटलेटिको माद्रिदच्या एंजल कोरियाने फिओरेन्टिना फॉरवर्ड गोन्झालेझची जागा घेतली आहे. तर जोआकिन कोरियाची जागा टियागो अल्माडा घेईल.

गोन्झालेझ आणि जोक्विन फिफा विश्वचषकातून बाहेर

अर्जेंटिना (Argentina) मंगळवारी ‘क’ गटातील पहिल्या सामन्यात सौदी अरेबियाशी (Saudi Arabia), त्यानंतर मेक्सिको आणि पोलंडशी सामना होईल.

Nicolas Gonzalez and Joaquin Correa
FIFA World Cup 2022 Tickets : एवढ्या लाखात मिळतंय 1 तिकीट; जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहायचे

डार्विन नुनेझ उत्तम फॉर्ममध्ये

23 वर्षीय नुनेझने युरोपियन लीगच्या इन-फॉर्म स्ट्रायकरपैकी एक म्हणून स्पर्धेत प्रवेश केला, जुलैमध्ये बेनफिकामधून लिव्हरपूलमध्ये सामील झाल्यापासून त्याने 18 सामन्यात नऊ गोल केले. फोर्लानने एका मुलाखतीत सांगितले की, "तो खूप चांगला फुटबॉलपटू असून उरुग्वे संघाचा महत्त्वाचा सदस्य होण्यासाठी तो आपला पराक्रम दाखवत आहे."

उरुग्वेनेही चमत्कार केला

दक्षिण आफ्रिकेतील (South Africa) विश्वचषकात सर्वोत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार जिंकणारा फोरलान म्हणाला की, 'मी योग्य वेळी खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे.' 10 संघांच्या दक्षिण अमेरिकन गटातील पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवून उरुग्वे कतार विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.

Nicolas Gonzalez and Joaquin Correa
FIFA World Cup: 'गोल्डन बूट' पुरस्कार कोणी अन् कधी जिंकला; पाहा आत्तापर्यंतची संपूर्ण यादी

24 नोव्हेंबरला ब्राझीलचा सामना सर्बियाशी होणार

उरुग्वे 24 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियाविरुद्ध फिफा विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल आणि एच गटातील पोर्तुगाल आणि घाना यांच्याशीही लढेल. 24 नोव्हेंबरला सर्बियाविरुद्ध ब्राझील स्पर्धेला सुरुवात करेल. पीएसजीसाठी नेमार 15 गोल करत फॉर्ममध्ये आहे. जी गटात स्वित्झर्लंड आणि कॅमेरुन यांच्यात सामना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com